आयपीएल 2024 मध्ये शनिवारी (18 मे) झालेल्या सामन्यात आरसीबीनं सीएसकेचा 27 धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात बंगळुरूनं प्रथम फलंदाजी करताना 218 धावा केल्या होत्या. चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी 201 धावा करायच्या होत्या. मात्र, बंगळुरूच्या गोलंदाजांनी चेन्नईला 191 धावांवरच रोखलं. या ऐतिहासिक विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियममधील वातावरण अद्भूत होतं. एकीकडे एमएस धोनीनं आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही, तर दुसरीकडे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा भावूक झालेले दिसले.
सामन्याच्या शेवटच्या षटकात एमएस धोनी बाद झाला, ज्यामुळे त्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकला नाही. बाद झाल्यानंतर धोनी ड्रेसिंग रूममध्ये दिसला. परंतु जेव्हा आरसीबीनं सामना जिंकला तेव्हा त्यानं बाहेर येऊन आरसीबीच्या काही खेळाडूंशी हस्तांदोलन केलं आणि पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये गेला. धोनी सहसा असं करत नाही. तो नेहमीच खिलाडूवृत्ती दाखवतो आणि सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करतो. मात्र या सामन्यात आरसीबीचे खेळाडू आपला विजय साजरा करण्यात इतके वाहून गेले होते की, शेवटी धोनीनं त्यांच्याशी हस्तांदोलन न करताच ड्रेसिंग रूममध्ये जाणं योग्य मानलं.
— Nihari Korma (@NihariVsKorma) May 19, 2024
जर आपण आरसीबीच्या विजयाबद्दल बोललो तर, विराट कोहली सर्वात आनंदी दिसत होता, कारण या विजयाचा अर्थ काय हे त्याला माहीत होतं. विजयानंतर विराटचे डोळे ओले झाले होते. यावेळी त्याची पत्नी अनुष्का शर्माही भावूक झालेली दिसली. विजयानंतर संपूर्ण स्टेडियम आरसीबीच्या जयजयकारानं गरजत होतं. यावेळी आरसीबीचे खेळाडू वेगळ्याच उर्जेने आनंद साजरा करताना दिसले.
Aaarrr Ceeee Beeee ❤️👏
6️⃣ in a row for Royal Challengers Bengaluru ❤️
They make a thumping entry into the #TATAIPL 2024 Playoffs 👊
Scorecard ▶️ https://t.co/7RQR7B2jpC#RCBvCSK | @RCBTweets pic.twitter.com/otq5KjUMXy
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2024
सामन्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यानं त्याला मिळालेला सामनावीराचा पुरस्कार युवा गोलंदाज यश दयालला समर्पित केला. दयालनं अखेरच्या षटकात धोनी आणि जडेजा क्रिजवर असताना टिच्चून गोलंदाजी केली. अखेरच्या षटकात सीएसकेला प्लेऑफला क्वालिफाय करण्यासाठी 17 धावांची आवश्यकता होती. मात्र दयालनं धोनीची विकेट घेत सामना आपल्या बाजूनं झुकवला. त्यानं अखेरच्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या आणि आपल्या संघाला प्लेऑफमध्ये पोहचवलं.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! धोनीच्या षटकारामुळे जिंकली आरसीबी, कशी ते जाणून घ्या
विराट कोहलीला घडवण्यात ‘या’ खेळाडूचा मोठा हात, सुनील गावसकर यांचं वक्तव्य