---Advertisement---

आरसीबीला पाठिंबा देण्यासाठी महिला संघ पोहोचला चिन्नास्वामीला, दोन महिन्यांपूर्वीच बनवलं होतं चॅम्पियन

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या 68 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमनेसामने आहेत. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकणारा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

या सामन्यात आरसीबीचा महिला संघ पुरुष संघाला सपोर्ट करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, महिला संघानं केवळ 2 महिन्यांपूर्वी आरसीबीला प्रथमच चॅम्पियन बनवलं होतं. महिला संघाची कर्णधार स्मृती मंधाना ते श्रेयंका पाटील पर्यंत अनेक स्टार खेळाडूंनी पुरुष संघाला पाठिंबा देण्यासाठी बंगळुरू गाठलंय. यावेळी महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारी भारतीय फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्स देखील महिला संघासोबत दिसली. महिला संघाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिला संघानं 2 महिन्यांपूर्वी महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलं होतं. बंगळुरू महिला संघाने अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या जात असलेल्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय आवश्यक आहे. गुणतालिकेत बंगळुरू 12 गुणांसह सहाव्या तर चेन्नई 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सीएसकेचा नेट रन रेटही आरसीबीपेक्षा चांगला आहे. अशा परिस्थितीत आरसीबीसाठी केवळ सामन्यात विजय नोंदवणं महत्त्वाचे नाही, तर संघाला असा विजय नोंदवावा लागेल जेणेकरुन धावगतीच्या बाबतीतही चेन्नईला मागे टाकता येईल. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, आरसीबीनं गेल्या 5 सामन्यांमध्ये सलग विजय नोंदवले आहेत, जे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट कोहलीला घडवण्यात ‘या’ खेळाडूचा मोठा हात, सुनील गावसकर यांचं वक्तव्य

‘करो या मरो’ सामन्यात ऋतुराज गायकवाडनं जिंकला टॉस, आरसीबीला फलंदाजीचं आमंत्रण

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार का? हेड कोचच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---