पुणे : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी किताबाची लढत रंगणार आहे. सिंकदरने माती, तर शिवराजने गादी विभागातून प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करून अंतिम फेरी गाठली.
प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा सुरु आहे
सिकंदरने मातीवरील अंतिम विभागात आपला लौकिक कायम राखताना वेगवान आणि आक्रमक खेळ करत पहिल्या फेरीतच संदीपवर सातत्याने ताबा मिळवत सलग दोन गुणांचा सपाटा लावला आणि दहा गुणांची वसुली करत तांत्रिक वर्चस्वावर विजय मिळवून केसरी किताबाच्या लढतीची अंतिम फेरी गाठली.
गादी विभागात शिवराज राक्षेने कमालीचा चपळपणा दाखवत हर्षद कोकाटेचा १३ गुणांची कमाई करत तांत्रिक वर्चस्वावर पराभव करून अंतिम फेरी गाठली. हर्षदने सातत्याने शिवराजच्या पटात घुसण्याचा प्रयत्न केला. पण, शिवराजने कमालीचा चपळपणा दाखवत हर्षदला निष्प्रभ केले. (Maharashtra Kesari Wrestling Tournament: Sikander Sheikh won in Clay Division and Shivraj Rakshe won in Gadi Division)
अन्य निकाल –
माती विभाग – ६५ किलो रोहन पाटील (कोल्हापूर) वि.वि. यश मगदूम (गडचिरोली), ७४ किलो -अनिल कचरे (पुणे) वि.वि. संदेश शिषमुळे (गडचिरोली) , ७० किलो – निखिल कदम (पुणे) वि.वि. अभिजित भोसले (सोलापूर), ६१ किलो – अमोल वालगुडे (पुणे जिल्हा) वि.वि. भालचंद्र कुंभ (पुणे), ५७ किलो – सौरभ इंगवे (सोलापूर) वि.वि. कृष्णा हरणावळ (पुणे), ८६ किलो – विजय डोईफोडे (सातारा) वि.वि. ओंकार जाधवराव (पुणे)
गादी विभाग ६१ किलो – पवन डोन्हर (नाशिक) वि.वि योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड), ७० किलो – विनायक गुरव (कोल्हापूर) वि. वि. संकेत पाटील (कोल्हापूर), ५७ किलो – आतिश तोडकर (बीड) वि.,वि. आकाश सलगर (सोलापूर). ७४ किलो – शुभम थोरात (पुणे ) वि.वि. राकेश तांबुलकर (कोल्हापूर)
महत्वाच्या बातम्या –
BIG BREAKING: सिकंदर शेख बनला 2023 चा महाराष्ट्र केसरी, गतविजेता शिवराज राक्षे पराभूत
BREAKING: विश्वचषकादरम्यानच भारतीय खेळाडूची निवृत्ती, अवघ्या 33 व्या वर्षी घेतला निर्णय