---Advertisement---

सिकंदर शेख बनला 2023 चा महाराष्ट्र केसरी, गतविजेता शिवराज राक्षे पराभूत

---Advertisement---

महाराष्ट्र कुस्ती वर्तुळातील सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी (10 नोव्हेंबर) खेळला गेला. या अंतिम सामन्यात वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेत्या शिवराज राक्षे याला पराभूत करत मानाची गदा मिळवली. पुणे येथील फुलगाव येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली‌ होती.

प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा खेळली गेली.

माती विभागाच्या अंतिम सामन्यात सिकंदर शेख याने सांगलीच्या संतोष मोटे याला पराभूत केलेले. तर, गादी विभागाच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे याने हर्षद कोकाटे याला मात दिली होती. त्यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेता शिवराज सिकंदर याला झुंज देऊ शकला नाही. केवळ 5.35 सेकंदात त्याने शिवराजला चितपट करत विजेतेपद पटकावले.

अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते. पण, शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला.

(Sikandar Shaikh Becomes New Maharashtra Kesari 2023 Shivraj Rakshe Lost)

हेही वाचा-
दिनेश कार्तिकच्या खांद्यावर पुन्हा कर्णधारपदाची धुरा, ‘या’ संघाचं करणार नेतृत्व
‘प्रामाणिकपणे सांगतो, मला फरक पडत नाही…’, ICC वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 बनूनही असे का म्हणाला भारतीय धुरंधर?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---