दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ गडी राखून पराभूत करत एकहाती विजय मिळवला. तर स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तान संघाने १० गडी राखून पराभूत केले होते. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी पाहता, चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाची २६ आणि हार्दिक पंड्याची २३ धावांची खेळी वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी भारतीय संघाला २० षटक अखेर ११० धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला.
या पराभवानंतर चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापकांच्या खराब रणानितीवर निशाणा साधला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी एक मिम शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी महाभारत मालिकेतील धृतराष्ट्राचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर, हे सर्व काय सुरू आहे? असे लिहिले आहे. यावर प्रतिक्रीया देत एका युजरने लिहिले की, “एमएस धोनीने विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा मेंटोर होण्यासाठी कोणतीही फी घेतली नाही, पण भारतीय संघाला त्याची किंमत मोजावी लागली आहे.”
https://twitter.com/Bari_747/status/1454826471177003010?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1454826471177003010%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.insidesport.in%2Ffeatured%2Find-vs-nz-live-social-media-reaction-on-team-india-poor-performence-india-vs-new-zealand-t20-reaction-49835%2F
https://twitter.com/BoloSharmaji/status/1454826895170670604?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1454826895170670604%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.insidesport.in%2Ffeatured%2Find-vs-nz-live-social-media-reaction-on-team-india-poor-performence-india-vs-new-zealand-t20-reaction-49835%2F
Each and every Indian batsmen today..#INDvsNZ #mentor pic.twitter.com/udMbNKqhwj
— Navneet Arya (@LogiclyiLogical) October 31, 2021
https://twitter.com/Vamos_Akshay/status/1454837077334376450?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1454837077334376450%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.insidesport.in%2Ffeatured%2Find-vs-nz-live-social-media-reaction-on-team-india-poor-performence-india-vs-new-zealand-t20-reaction-49835%2F
#captaincy #mentor
BCCI / Indian cricket team *Right now pic.twitter.com/aaerHviMoY— Suvó (@iamsub21) October 31, 2021
Video : पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर इस्लामपुरात तरुणाने टीव्ही फोडला#INDvPAK #IndiaVsPak #T20WorldCup #TeamIndia pic.twitter.com/4pXO72yXjB
— Maharashtra Times (@mataonline) October 25, 2021
Fans trolling #ViratKohli & #Hitman for poor performance
Meanwhile Mentor Singh Dhoni :- pic.twitter.com/xQx6nVQuh4
— CUagain (@RECinaction) October 31, 2021
Its first time in cricket history 😂😂🙏 #IndiaVsNewZealand #banipl pic.twitter.com/G4ET3m2mn9
— Zaman 𝕄𝕖𝕙𝕒𝕣 (@Mrinsafian) October 31, 2021
If this made u laugh than Retweet #IndiaVsNewZealand#INDvsNZ #panauti #BanIpl pic.twitter.com/SyParUmUWY
— Lock Upp (@LockUppLive) October 31, 2021
या पराभवाचे खापर एमएस धोनीच्या डोक्यावर फोडत अजून एका युजरने प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील चंपकलालचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो लपून बसला आहे. या फोटोवर कॅप्शन देत त्याने लिहिले की, “चाहते विराट कोहली आणि रोहित शर्माला त्यांच्या खराब कामगिरीमुळे ट्रोल करत असताना, एमएस धोनी.” तर आणखी एका युजरने रवीश कुमार यांचा एक फोटो ट्विट केला आहे ज्यावर, “भीतीचे वातावरण आहे.” असे लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा विश्वचषकात बॅटिंग ऑर्डरवरुन गोंधळला कर्णधार विराट, २०१९ मध्येही अशीच डुबवलेली भारताची नाव
टेक इट इझी! ‘या’ समीकरणांनी ‘टीम इंडिया’ अजूनही पोहचू शकते उपांत्य फेरीत