सलग दोन सामन्यांत पराभूत होत अखेर भारतीय संघाला विशाखापट्टणम येेथे झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विजय प्राप्त झाला आहे. मालिकेत आपले स्थान टिकून राहण्यासाठी अतिमहत्वाच्या या सामन्यात भारताने ४८ धावांनी विजय मिळवला आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ असा मागे आहे. यावेळी कटक येथे घडलेल्या गोष्टीचा नजारा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे.
या मालिकेत भारताचे फलंदाज आणि गोलंदाज उत्तम खेळत असले तरीही पंतच्या नेतृत्व आणि फलंदाजीवर प्रश्न निर्माण होत आहेत. झाले असे की, तिसऱ्या सामन्यात पंत धावा करण्यात अडखळत होता. त्याने १६व्या षटकात ड्वेन प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर लोफ्टी शॉट मारण्याच्या प्रयत्नात असताना चेंडू बॅटची कड घेऊन उंचावर गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याने सहज तो झेल घेतला. यावेळी पंत ६ धावांवर खेळत होता.
IND vs SA 2022, 3RD T20I: Rishabh Pant Wicket on BCCI: https://t.co/E70fW9J2Km
— jasmeet (@jasmeet047) June 14, 2022
कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यातही तो ५ धावांवर असताना असाच बाद झाला होता. केशव महाराजच्या गोलंदाजीवर त्याने उंचावर शॉट मारला होता. त्यावेळी सीमारेषेजवळ उभे असलेल्या रस्सी व्हॅन डर डुसेनने त्याचा झेल घेतला होता.
IND vs SA 2022, 2ND T20I: Rishabh Pant Wicket on BCCI: https://t.co/8FoZcTJ4EZ
— jasmeet (@jasmeet047) June 14, 2022
तिसऱ्या सामन्यात बाद होण्यापूर्वी पंतला दोनदा जीवनदान मिळाले होते. एकदा त्याचा झेल सोडला होता आणि स्टपिंग होताना तो वाचला होता. मागील दोन्ही सामन्यात पंतने वाईट शॉट्स खेळून विकेट गमावली आहे. त्याने दिल्लीच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. येथे १६ चेंडूत २९ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने दोन चौकार आणि दोन षटकार देखील मारले होते.
इशान किशन (Ishan Kishan) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) या जोडीने तिसऱ्या सामन्यात तुफानी फलंदाजी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. मात्र हे दोघे बाद झाल्यावर भारतीय संघाचा धावा करण्याचा वेग संथ झाला. नंतर गोलंदाजांनी प्रयत्न पणाला लावत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक वेळ टिकूच दिले नाही.
या सामन्यात युझवेंद्र चहल ३ आणि हर्षल पटेलने ४ विकेट्स घेतल्या. बाकी गोलंदाजांनी योग्य साथ दिल्याने भारताने सामन्यातील विजय पक्का केला. भुवनेश्वर कुमारला एक विकेट मिळाली असली तरी त्याचा इकॉनॉमी रेट ५.२० होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsSA T20: मालिकेत पुनरागमनाचे श्रेय ‘कॅप्टन’ रिषभ पंतने दिले ‘या’ खेळाडूंना
भारताला तडफदार सुरुवात देणाऱ्या ‘ऋतु-इशान’ने रचलाय इतिहास, वाचा काय आहे विक्रम
ऋतुराजचं नाणं खणखणीत वाजलं, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक केलं