पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील तिसरा डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) शनिवारी (९ एप्रिल) होणार आहे. शनिवारचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. हंगामातील हा १८वा सामना असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. तसेच त्याआधी ७ वाजता नाणेफेक होईल. या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.
असा असू शकतो बेंगलोरचा संभावित संघ
या सामन्यासाठी बेंगलोरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (RCB Predicted Playing Xi) फार बदल असण्याची शक्यता दिसत नाहिये. मात्र संघात केवळ १ प्रमुख बदल दिसू शकतो. धाकड अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याचे संघात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. नुकताच मॅक्सवेल लग्नबंधनात अडकला आहे, याच कारणास्तव तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकला होता. शेरफेन रुदरफोर्डला संघाबाहेर बसवत मॅक्सवेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाईल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (संभावित प्लेइंग इलेव्हन)–
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), डेविड विली, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज
असा असू शकतो मुंबईचा संभावित संघ
दुसरीकडे यंदा बॅकफूटवर पडलेल्या मुंबईच्या संघातून गोलंदाज डॅनियल सॅम्सला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध अतिशय महागडी गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याच्याजागी फॅबियन ऍलेनला संघात जागा दिली जाऊ शकते. इतर संघ जसाच्या तसा (MI Predicted Playing Xi) असेल.
मुंबई इंडियन्स (संभावित प्लेइंग इलेव्हन)–
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलन/डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बसिल थम्पी
अशी असू शकते ड्रीम ११
बेंगलोर आणि मुंबई (RCB vs MI) सामन्याच्या ड्रीम ११ बद्दल (Dream Xi) विचार करायचा झाल्यास, यष्टीरक्षक म्हणून फॉर्मात असलेल्या दिनेश कार्तिक आणि इशान किशन या दोघांनीही संधी दिली जाऊ शकते. तर तुम्ही अष्टपैलूंमध्येही दोघांवर दाव लावू शकता. बेंगलोरचा हुकुमी एक्का वानिंदू हसरंगा आणि मुंबईचा तगडा डेवाल्ड ब्रेविस अष्टपैलू विभागात असतील. फलंंदाजीत चौफेर फटकेबाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि सध्या जबरदस्त प्रदर्शन करत असलेल्या तिलक वर्मा, या २ मुंबईकरांना खेळवू शकता. तर बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल हे येतील. गोलंदाजीमध्ये पर्पल पटेल म्हणून ओळखला जाणारा हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज असतील.
कर्णधार – सूर्यकुमार यादव
उपकर्णधार – फाफ डू प्लेसिस
यष्टीरक्षक – दिनेश कार्तिक, इशान किशन
फलंदाज – सूर्यकुमार यादव, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, तिलक वर्मा
अष्टपैलू – वानिंदू हसरंगा, डेवाल्ड ब्रेविस
गोलंदाज – हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| चेन्नई वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
GT vs PBKS| शेवटच्या दोन चेंडूवर षटकार लगावताच तेवातियाचा धोनी-जडेजाच्या खास क्लबमध्ये समावेश