पुणे | रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स (RCB vs MI) यांच्यात शनिवारी (०९ एप्रिल) आयपीएल २०२२चा (IPL 2022) अठरावा सामना (IPL 2022 18th Match) रंगणार आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकत बेंगलोरचा संघ विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर मुंबईचा संघ त्यांच्या विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्न करेल.
खेळपट्टी आणि हवामान
पुण्याच्या एमसीए स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना मदत करेल. मात्र खेळ जसजसा पुढे जाईल, तशी फिरकीपटूंना खेळपट्टीकडून मदत मिळताना दिसेल. शनिवारी पुण्यातील वातावरण साफ राहिल. दिवसा ४० डिग्री आणि रात्री २३ डिग्री सेल्सियसच्या जवळपास तापमान असेल. पावसाची शक्यता केवळ ५ टक्के असेल. रात्री पुण्याच्या खेळपट्टीवर दव पडायला सुरुवात होईल. त्यामुळे नाणेफेक जिंकलेला संघ प्रथम गोलंदाजी करण्याला प्राधान्य देईल.
आयपीएल २०२२ हंगामातील बेंगलोर विरुद्ध मुंबई सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध मुंबई सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध मुंबई सामना ०९ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध मुंबई सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध मुंबई सामना महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम, पुणे येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध मुंबई सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध मुंबई सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध मुंबई सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
असे असू शकतात संभावित संघ
या सामन्यासाठी बेंगलोरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फार बदल असण्याची शक्यता दिसत नाहिये. मात्र संघात केवळ १ प्रमुख बदल दिसू शकतो. धाकड अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याचे संघात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. नुकताच मॅक्सवेल लग्नबंधनात अडकला आहे, याच कारणास्तव तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकला होता. शेरफेन रुदरफोर्डला संघाबाहेर बसवत मॅक्सवेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाईल.
दुसरीकडे यंदा बॅकफूटवर पडलेल्या मुंबईच्या संघातून गोलंदाज डॅनियल सॅम्सला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध अतिशय महागडी गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याच्याजागी फॅबियन ऍलेनला संघात जागा दिली जाऊ शकते. इतर संघ जसाच्या तसा असेल.
असे असू शकतात संभावित संघ-
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), डेविड विली, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज
मुंबई इंडियन्स –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलन/डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बसिल थम्पी
महत्त्वाच्या बातम्या-
GT vs PBKS| शेवटच्या दोन चेंडूवर षटकार लगावताच तेवातियाचा धोनी-जडेजाच्या खास क्लबमध्ये समावेश
IPL 2022| हैदराबाद की चेन्नई कोण मिळवणार पहिला विजय? सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही
‘त्याने हलवाईच्या दुकानात बसले पाहिजे, आता त्याला बॅटिंग…’, बाद होताच मयंक चाहत्यांच्या निशाण्यावर






