वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय क्रिकेट संघाची विजयी घौडदौड सुरूच आहे. या स्पर्धेत संघाने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला आहेत. विशेषत: भारतीय संघाच्या गोलंदाजीने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारताची गोलंदाजी इतर संघांच्या तुलनेत खूपच सरस दिसून आली. मात्र, भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या गोलंदाजीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गांगुली म्हणाला, ‘मी असे म्हणणार नाही की, हे भारताचे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे. 2003 च्या विश्वचषकात आशिष नेहरा, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनीही शानदार गोलंदाजी केली होती. 2003 चा विश्वचषक भारताच्या या तीन दिग्गज वेगवान गोलंदाजांसाठी खूप खास होता. या विश्वचषकात झहीर खानने 18, श्रीनाथने 16 आणि आशिष नेहराने 15 बळी घेतलेले. त्यांच्या कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचलेला.”
तो पुढे बोलताना म्हणाला, “असे असले तरी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व शमी यांना एकत्रित गोलंदाजी करताना पाहणे नक्कीच शानदार आहे. खास करून बुमराह दोन्ही बाजूनी फलंदाजांवर दबाव टाकतो. त्यांचा भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या यशात मोठा वाटा राहिला आहे.”
भारताच्या या तीनही वेगवान गोलंदाजांनी या विश्वचषकात आतापर्यंत दमदार कामगिरी करताना विरोधी संघांवर वर्चस्व गाजवले आहे. शमीने 16, बुमराहने 13 तर सिराजने 10 बळी आपल्या नावे केले आहेत. त्यांना दोन्ही फिरकीपटू रवींद्र जडेजा व कुलदीप यादव चांगली साथ देत आहेत.
(Sourav Ganguly Said This Is Not Our Best Bowling Trio)
महत्वाच्या बातम्या –
रूटने रचला इतिहास! ईडन गार्डन्सवर पार केला इंग्लंड क्रिकेटमधील मैलाचा दगड
मार्शच्या नाबाद 177 धावांत बांगलादेशची धूळधाण! दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियाचा पुण्यात पराक्रम