मुंबई। मंगळवारी, 22 मेला आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच महिलांचा सामना खेळवण्यात आला. हा सामना ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवास संघात पार पडला.
वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात हरमनप्रीत कौर कर्णधार असलेल्या सुपरनोवास संघाने स्मृती मानधनाच्या ट्रेलब्लेझर्स संघावर 3 विकेट्सने विजय मिळवला.
ट्रेलब्लेझर्स संघाने सुपरनोवास समोर विजयासाठी 130 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सुपरनोवास संघाकडून डॅनियल वॅटने सर्वाधिक 24 धावा केल्या.
सुपरनोवासच्या बाकी फलंदाजांपैकी मिताली राज(22), मेग लेनिंज्स(16), हरमनप्रित कौर(21), सोफी डेविन(19), एलिस पेरी(13*), वेदा कृष्णमुर्ती(2), मोना मेश्राम(4), पुजा वस्त्राकार(2*) यांनी धावा करत संघाला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला.
ट्रेलब्लेझर्स संघाकडून झुलन गोस्वामी(1/22), सुझी बेट्स(2/16), एकता बिश्त(1/24) आणि पुनम यादव(2/21) यांनी विकेट्स घेतले.
तत्पूर्वी, ट्रेलब्लेझर्स संघाकडून सुझी बेट्स(32), जेमीमी रोड्रीग्ज(25) आणि दिप्ती शर्मा(21) यांनी थोडीफार लढत दिली. तर अन्य फलंदाजांपैकी अायसा हेली (7), स्म्रिती मानधना (14), बेथ मुनी(4), डॅनियल हेजल(3), शिखा पांडे(14) यांनी धावा केल्या.
सुपरनोवासकडून अनुजा पाटिल(1/34), मेगन शट्स(2/18),एलिस पेरी(2/20) आणि राजेश्वरी गायकवाड(1/21) यांनी विकेट्स घेत ट्रेलब्लेझर्सला 20 षटकात 6 बाद 129 धावांवर रोखले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी-रैना: ये जोडी हैं नंबर १
–IPL 2018: आयपीएलच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी खुशखबर
–Video: सुपरवुमन हरमनप्रीत कौरने घेतला एबी डेविलियर्सपेक्षाही भारी कॅच
–रैनाने आज तुफानी खेळी केली तर या विक्रमासाठी विराटला वर्षभर वाट पहावी लागणार!
-शिखर धवनला हा विक्रम करत धोनीला मागे टाकण्याची संधी
–वाचा- वेळा बदलल्या आहेत मग आजचा सामना नक्की आहे तरी किती वाजता?
–जर आजचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज पराभूत झाले तर….