इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत ५ वेळेस जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स संघ १४ व्या हंगामात संघर्ष करताना दिसतोय. दुसऱ्या टप्प्यात या संघाला सलग ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेर मंगळवारी (२८ सप्टेंबर) झालेल्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत या संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. या विजयानंतर खेळाडूंसह डगआऊटमध्येही जल्लोषाचे वातावरण परसलेले पाहायला मिळाले.
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या ३ सामन्यात मुंबई इंडियन्स संघाच्या हाती निराशा लागली होती. सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्स संघाने २० धावांनी पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ गडी राखून पराभूत केले होते. तसेच तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध मुंबई इंडियन्स संघाला ५४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे असे वाटू लागले होते की, मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणार. परंतु जोरदार पुनरागमन कसे करायचे हे या संघाला चांगलेच माहीत आहे.
मुंबई इंडियन्स संघाने पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी करत जोरदार विजय मिळवला. या विजयानंतर मुंबई इंडियन्स संघातील समर्थकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले पाहायला मिळाले. तसेच रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आणि हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टेनकोव्हिक यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य फुलले होते. त्यांच्यासोबत सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी ही सुद्धा आनंदी दिसली. त्यांच्याखेरीज क्विंटन डी कॉकच्या पत्नीनेही नाचून मुंबईच्या विजयाचा आनंद साजरा केला.
😊💙 #MIvKXIP
📸:@ritssajdeh | @ImRo45 pic.twitter.com/sVVlU0Bn4k
— Ritika Sajdeh Team (@ImRitika45) September 28, 2021
त्या तिघीही प्रत्येक सामन्यात त्यांच्या मुंबई संघाला चीयर करण्यासाठी मैदानात उपस्थित राहत असतात. परंतु गेल्या ३ सामन्यात संघांने निराशाजनक कामगिरी केल्यामुळे यांना जल्लोष साजरा करण्याची संधी मिळाली नव्हती. दरम्यान पंजाब किंग्स संघाला पराभूत केल्यानंतर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. रितिका, देविशा आणि नताशाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा जोरदार विजय
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना एडेन मार्करमने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली होती. तर दीपक हुड्डाने २८ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्स संघाला ६ षटक अखेर १३५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना सौरभ तिवारीने सर्वाधिक ४५ धावांचे योगदान दिले होते. तर हार्दिक पंड्याने तुफान फटकेबाजी करत नाबाद ४० धावांचे योगदान दिले आणि मुंबई इंडियन्स संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: जब मिले दो जिगरी यार! कोलकाता-दिल्ली सामन्यापूर्वी मैदानावर शिखरची हरभजनला कडाडून मिठी
अगग! बिश्नोईने अवघ्या ८ धावांवर रोहितला दाखवला पव्हेलियनचा रस्ता, लाजिरवाण्या विक्रमात बनला नंबर १
पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी संजनाने केली होती भविष्यवाणी, बुमराह घेईल ‘इतक्या’ विकेट्स अन्…