---Advertisement---

पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी संजनाने केली होती भविष्यवाणी, बुमराह घेईल ‘इतक्या’ विकेट्स अन्…

On: बुधवार, सप्टेंबर 29, 2021 8:12 AM
---Advertisement---

मंगळवार रोजी (२८ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील ४२ वा सामना झाला. ६ विकेट्सने हा सामना जिंकत मुंबई संघाने युएई टप्प्यातील त्यांच्या विजयाचे खाते उघडले. त्यांच्या या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचाही महत्वपूर्ण वाटा राहिला. त्याने या सामन्यादरम्यान २ महत्त्वपूर्ण विकेट्स चटाकवल्या. त्याच्या या कामगिरीनंतर त्याची पत्नी आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन चर्चेत आली आहे.

मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वीच संजनाने बुमराहबद्दल एक भविष्यवाणी केली होती. या सामन्यात तो किती विकेट्स घेईल?, यासंबंधी ती भविष्यवाणी होती. विशेष बाब अशी की, तिची ती भविष्यवाणी अगदी खरी ठरली आणि यामुळेच तिची भरपूर चर्चा होते आहे.

सोशल मीडियावर संजानाचा भविष्यवाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ती मुंबई संघाच्या चाहत्यांशी ऑनलाईन संवाद साधताना दिसते. यादरम्यान एक चाहता तिला, ‘बुमराह या सामन्यात किती विकेट घेईल?’ असा प्रश्न विचारतो. यावर ती म्हणते, ‘खरे म्हणजे मला वाटते की, त्याने या सामन्यात ५ विकेट्स घ्याव्यात. पण तो २ विकेट्स नक्की काढेल.’

https://twitter.com/mipaltan/status/1442882148935995395?s=20

दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने पंजाबला २० षटकांमध्ये ६ बाद १३५ धावांवर रोखले होते. पंजाबकडून ऍडम मार्करमने सर्वाधिक ४२ धावा केल्या होत्या. तसेच हुड्डाने २८ धावांचे आणि केएल राहुलने २१ धावांचे योगदान दिले होते. मुंबईकडून बुमराह आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या. पंजाबच्या १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून सौरभ तिवारीने सर्वाधिक ४५ धावा केल्या होत्या. तसेच हार्दिक पंड्याने नाबाद ४० धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. पंजाबकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक २ विकेट्स काढल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

केएल राहुलला बाद करताच पोलार्डकडून ३०० व्या टी२० विकेट्सचे भन्नाट सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ

बडे दिल वाले! जोराचा थ्रो लागल्याने मैदानावरच विव्हळू लागला तिवारी, पंजाबच्या खेळाडूंनी त्वरित घेतली धाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---