वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा काल, 16 सप्टेंबर रोजी करण्यात आली. वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडू खेळताना दिसणार आहेत. टी-20 संघातही काही बदल करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेचे वेळापत्रक आणि दोन्ही संघांमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळाली आहे.
वनडे मालिकेचे वेळापत्रक
27 सप्टेंबर – पहिला वनडे, तिरुवनंतपुरम, दुपारी 2 वाजता
30 सप्टेंबर – दुसरा वनडे, गुवाहाटी, दुपारी 2 वाजता
3 ऑक्टोबर – तिसरा वनडे, न्यू चंदीगड, दुपारी 2 वाजता
टी-20 मालिकेचे वेळापत्रक
6 ऑक्टोबर – पहिला टी-20, लखनऊ, संध्याकाळी 7 वाजता
9 ऑक्टोबर – दुसरा टी-20, रांची, संध्याकाळी 7 वाजता
11 ऑक्टोबर – तिसरा टी-20, इंदूर, संध्याकाळी 7 वाजता
14 ऑक्टोबर – चौथा टी-20, हैदराबाद, संध्याकाळी 7 वाजता
16 ऑक्टोबर – पाचवा टी-20, बंगळुरू, संध्याकाळी 7 वाजता
भारताचा वनडे संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, औकिब नबी, यशस्वी जयस्वाल आणि नमन धीर.
भारताचा टी-20 संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि मयंक यादव.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची ठळक वैशिष्ट्ये
ऋतुराज गायकवाडचे पुनरागमन
ध्रुव जुरेल दुसरा यष्टीरक्षक
औकीब नबीचा संघात समावेश
नमन धीरला पहिल्यांदाच वनडे संघात संधी
रवींद्र जडेजाचे वनडे संघात पुनरागमन
नितीश कुमार रेड्डीचे पुनरागमन
मोहम्मद सिराजही वनडे संघात परतला






3 माफीनामे आणि मेस्सीसाठी खास मॅसेज! 24 तासांमध्ये रोनाल्डोची दुसरी बाजू समोर