भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहे. दुखापतीच्या कारणास्तव बुनराह पुढचा मोठा काळ देखील खेळू शकणार नाहीये. अशात भारतीय संघाला त्याची कमी जाणवत आहे. पण रोहितच्या मते भारतीय संघ आता बुमराहव्यतिरिक्त खेळायल शिकला आहे. बुमराह नसताना संघातील इतर गोलंदाजांना त्याची जागा घ्यावी लागत आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना स्पेंटबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेआधीही बुमराह दुखापतीमुळे काही काळ संघातून बाहेर राहिला होता. ऑसट्रेलियाविरुद्ध संघात पुनरागमन केल्यानंतर त्याला पुन्हा दुखापत झाला आणि मागच्या पाच – सह महिन्यांमध्ये त्याने एकही सामना खेळला नाहीये. मागच्या वर्षी आशिया चषकासह टी-20 विश्वचषकातून देखील त्याने माघार घेतली होती. त्याने नुकतीच न्यूझीलंडमध्ये जाऊन दुखापतीवर शस्त्रक्रिया केली आणि पुर्णपणे ठीक होण्यासाठी अजून सहा महिने विश्रांती घेणार आहे. म्हणजे आयपीएल 2023 हंगामात बुमराह खेळणार नाहीच, आगामी आशिया चषकात देखील त्याचे खेळणे निश्चित मानता येणार नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेत पराभव स्वीकारल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) माध्यमांशी चर्चा करत होता. यावेळी रोहितला बुमराहविषयी प्रश्न विचारला गेला. यावर रोहित म्हणाला, “जसप्रीत बुमराह आठ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून संघातून बाहेर आहे. त्यामुळे संघाला त्याच्याशिवाय खेळायची सवय झाली आहे. आम्हा सर्वांना माहित आहे की, बुमराची जागा भरणे सोपे नाहीये. पण तो उपलब्ध नसल्याने याविषयी विचार न करता आम्हाला पुढे जावे लागणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. सिराज, शमी, शार्दुल, उमरान आणि जयदेव उनाडकड चांगले गोलंदाज आहे. या खेळाडंकडे चांगली गुणवत्ता आहे.”
दरम्यान, रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली. या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने, तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिल्याने भारताने 2-1 असा विजय मिळवसा. उभय संघांतील वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. वनडे मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीवर आहे. शेवटचा आणि निर्णायक वनडे सामना 22 मार्च रोजी चेन्नईमध्ये खेळला जाईल.
(Playing in absence of Jasprit Bumrah in normal now days says Rohit Sharma)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेमिसनच्या जागी सिसांडा मगाला सीएसकेच्या ताफ्यात, जाणून घ्या नवख्या खेळाडूवर विश्वास दाखवण्याचे कारण
महिंद्रा IBA महिला बॉक्सिंग: भारताच्या निखत झरीन आणि मनिषा उप-उपउपांत्यपूर्व फेरीत