क्रिकेटटॉप बातम्या

जेमिसनच्या जागी सिसांडा मगाला सीएसकेच्या ताफ्यात, जाणून घ्या नवख्या खेळाडूवर विश्वास दाखवण्याचे कारण

आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्ज संघात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला याला संधी दिली गेली आहे. सीएसकेने रविवारी (19 मार्च) सिसांड मगाला याच्यासोबत आगामी आयपीएल हंगामासाठी करार झाल्याचे घोषित केले. न्यूझीलंडचा वेगवानगोलंदाज काईम जेमिसन दुखापतीच्या कारणास्तव आगामी आयपीएल हंगामात खेळणार नाहीये. अशात सीएसकेने मगालाला जेमिसनच्या बदली खेळाडूच्या रूपात ताफ्यात सामील केले.

न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज काईल जेमिसन (Kyle Jamieson) याला खरेदी करण्यासाठी सीएसकेने 1 कोटी रुपये खर्च केले होते. पण दुखापतीमुळे आगामी आयपीएल हंगामातून त्याला माघार घ्यावी लागली. अशात संघाला त्याची जागा भरून काढण्यासाठी सीएसकेला जेमिसनच्या तोडीस तोड असा वेगवान गोलंदाज हवा होता. सिसांडा मगाला (Sisanda Magala) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमी खेळले असले, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा अनुभव मोठा आहे. याच कारणास्तव सीएसकेने त्याला जेमिसनच्या बदली खेलाडूच्या रूपात संघात सामील केले. फ्रँचायझीने यासाठी 50 लाख रुपये मोजले, जी त्याची बेस प्राईस आहे.

आयपीएलने सीएसकेच्या या याविषयी माहिती देत म्हटले की, “मगाला दक्षिण आफ्रिका संघासाठी फक्त चार टी-20 सामने खेळला आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमधील टी20 सामन्यांमध्ये तो मागच्या अनेक वर्षांपासून विकेट्स घेत आला आहे. तो आपल्या 50 लाख रुपयांच्या बेर प्राईसमध्ये सीएसकेसोबत जोडला जाईल.”

दरम्यान, जेमिसनला मागच्या वर्षी जून हमिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात घेतले गेले होते. पण या मालिकेदरम्यान त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. पूर्णपणे ठीक होण्यासाठी जेमिसनला अजून चार महिन्यांचा काळ लागू शकतो. दुसरीकडे मगालाने नुकत्याच खेळल्या गेलेल्या एसए20 लीगमध्ये सनरायझर्स ईस्टर्न कॅप संघासाठी जबरदस्त प्रदर्शन केले. एसए20 लीगचा हा पहिलाच हंगाम होता, ज्यामध्ये मगालाने 12 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या. एसए20 लीगमधील या प्रदर्शनाच्या जोरावर मगालाने सीएसकेमध्ये जागा मिळवल्याचे सध्या तरी दिसत आहे. आगामी हंगामात त्याच्या प्रदर्शनावर सर्वांचेच लक्ष असेल.
(Sisanda Magala has been given a chance to replace Kyle Jamieson in CSK.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अपयशी ठरत असलेल्या सूर्याला ‘या’ कारणाने मिळतेय संधी! स्वतः कर्णधार रोहितने केला खुलासा
विशाखापट्टणममध्ये झाली 14 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती! गुवाहाटीत ऑस्ट्रेलियानेच दिलेली भळभळती जखम

Related Articles