Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नजम सेठींची आश्चर्यकारक माहिती, ‘या’ बाबतीत पीएसएलने आयपीएलला टाकले मागे?

नजम सेठींची आश्चर्यकारक माहिती, 'या' बाबतीत पीएसएलने आयपीएलला टाकले मागे?

March 19, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Najam Sethi & Jay Shah

Photo Courtesy: Twitter


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी एक आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आणली आहे. सेठींच्या माहितीनुसार पाकिस्तान सुपर लीग पाहणाऱ्यांची संख्या इंडियन प्रीमियर लीगपेक्षा जास्त झाली आहे. पाकिस्तानसाठी ही मोठी कामगिरी असल्याचे सेठींना वाटते. दरम्यान, शनिवारी पीएसएलचा अंतिम सामना लारोह कलंदर्सने जिंकल्यानंतर सेठींचे हे वाधान चर्चेत आले आहे.

पीएसएल 2023 (PSL) हंगाम लाहोर कलंदर्स संघाने जिंकली. अंतिम सामन्यात लाहोरने मुतलान सुलतान्स संघाला धूळ चारली. उभय संघांतील ही लढत चांगलीच रोमांचक ठरली. शेवटच्या चेंडूवर चार धावांची आवश्यकता असताना मुलतानचे फलंदाज दोन धावा घेऊ शकले. परिणामी लाहोर कलंदर्स एक धाव शिल्लक ठेवून विजय मिळवला. लाहोरने प्रथम फलंदाजी करताना 200 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुलतान 8 बाद 199 धावा करू शकला. लाहोर पीएसएल ट्रॉपी दोन वेळा जिंकणारा पहिलाच संघ ठरला आहे. हा अंतिम सामना झाल्यानंतर पीसीबी अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेत पीएसएल पाहणाऱ्यांविषयी मोठी माहिती दिली.

पत्रकार परिषदेत नजम सेठी (Najam Sethi) यांनी असे सांगितेल की, पीएसएलची डिजिटल व्हिवरशिप 150 मिलियन राहिली आहे, जी तुलनेने आयपीएलपेक्षा अधिक आहे. सेठी म्हणाले, “यावेळी मैदानात चाहत्यांनी विक्रमी उपस्थितीत लावली आणि तिकिटे देखील मोठ्या प्रमाणात विकले गेले. डिजिटलविषयी बोलायचे झाले तर पीएसएल हंगाम अर्धा खेळला गेला होता, तेव्हा मी रेटिंगविषयी विचारले होते. माझा नजम सेठी शोला 0.5 रेटिंग मिळत असायची. पण पीएसएलला 11 पेक्षा जास्त रेटिंग मिळत आहे. त्यामुळे हंगाम संपल्यानंतर रिटिंग 18 ते 20 असू शकते. 150 मिलियनपेक्षा जास्त लोक डिजिटली सी लीग पाहत आहे. याच तुलनेत आयपीएलची डिजिटल रेटिंग 130 मिलियन होती. पाकिस्तानसाठी ही मोठी कामगिरी आहे.”

Digital media ratings of PSL 8 were higher than IPL: Najam Sethi #PSL8 pic.twitter.com/2ciNtVsWfm

— Cricket Pakistan (@cricketpakcompk) March 18, 2023

दरम्यान, पीएसएल आणि आयपीएल यांच्यात नेहमीच तुलान होत राहिली आहे. पाकिस्तानमधील अनेक क्रिकेट जाणकार असा दावा करत असतात की, पीएसएलचा दर्जा हा आयपीएलपेक्षा चांगला आहे. पीएसएलमध्ये एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज आहेत, पण आयपीएलमध्ये मात्र चेंडूची गती कमी पाहायला मिळते, असा दावाही अनेकदा केला जातो.
(Najam Sethi opined that PSL has more digital viewership than IPL)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अष्टपैलू खेळी दाखवत शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा बनला पीएसएल चॅम्पियन, कायनर पोलार्डचा संघ पराभूत
आर्किटेक्चर आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग । मराठवाडा कॉलेजची ब्रिकवर मात


Next Post
Team-India

दुसरी वनडे : नाणेफेकीचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात, भारताचा कर्णधार बदलला, पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन

Photo Courtesy: Twitter/ICC

विशाखापट्टणममध्ये मोठी कामगिरी करणार स्टीव स्मिथ? भारताविरुद्ध मोडणार दिग्गजाचा विक्रम

Steve Smith Rohit Sharma

स्मिथने चित्त्याच्या चपळाईने घेतला कॅच, ऑस्ट्रेलियन कर्णधाराची लवचिकता पाहून रोहित अवाक

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143