Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीसंतच वेगळंच असतं! आयपीएलसाठी पाठिंबा एका संघाला आणि जिंकण्याची प्रार्थना दुसऱ्या संघासाठी

March 18, 2023
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
sreeshant

Photo Courtesy: Twitter/IPL


जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023‌ सुरू होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. त्याआधी स्पर्धेचे वातावरण तापू लागले असून, अनेक आजी-माजी क्रिकेटपटू अंदाज व्यक्त करत आहेत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने देखील आगामी हंगामासाठी आपला आवडता संघ व आपण पाठिंबा देत असलेल्या संघाचे नाव जाहीर केले आहे.

आयपीएलमधील प्रमुख खेळाडू राहिलेला श्रीसंत 2013 आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर क्रिकेटच्या मुख्य प्रवाहातून बाहेर झाला होता. नुकतेच त्याने एक मुलाखत दिली. यामध्ये त्याच्या आवडत्या संघाविषयी त्याला विचारण्यात आले. यावर उत्तर देताना तो म्हणाला,

“माझा पाठिंबा राजस्थान रॉयल्स संघाला असेल. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संघाचा कर्णधार संजू सॅमसन हा माझेच राज्य असलेल्या केरळमधून येतो. असे असले तरी माझी इच्छा आहे की, यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने स्पर्धेचे विजेतेपद जिंकायला हवे. तसेच यंदा देखील चेन्नई सुपर किंग्स विजेता होणार नाही.”

श्रीसंत आपल्या कारकिर्दी दरम्यान किंग्स इलेव्हन पंजाब, कोची टस्कर्स व राजस्थान रॉयल्स या संघांसाठी खेळला होता. मात्र, 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरण समोर आल्यानंतर तो सात वर्ष कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नव्हता. 2021 व 2022 आयपीएल लिलावासाठी त्याने नावनोंदणी केली होती. मात्र, त्याच्यावर एकाही संघाने बोली लावली नाही.

आयपीएल 2023 हंगाम 31 मार्चपासून अहमदाबाद येथे सुरू होईल. हंगामातील पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान खेळला जाईल. यावेळी देखील स्पर्धेत दहा संघ सहभागी होणार असून, स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी खेळला जाणार आहे.

Sreesanth said im supporting Rajasthan Royals due to Sanju Samson the only mallu captain, but want RCB to win

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका पराभवाने खचला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर; म्हणाला, ‘आम्ही राहुलसारखी फलंदाजी…’
ब्रेकिंग! विराटच्या RCBची ताकद वाढली, भारताविरुद्ध 140 धावा चोपणारा ‘हा’ खेळाडू ताफ्यात सामील


Next Post
Sachin-Tendulkar-MI

वनडे क्रिकेट वाचवण्यासाठी सचिनने सांगितले 'मास्टर सोल्युशन'! म्हणाला,"असा विचार करा"

Photo Courtesy: Instagram/Pat Cummins

दिवंगत आईसाठी कमिन्सने केली भावूक पोस्ट! लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत लिहीले...

Photo Courtesy: Twitter/WPL

मुंबईची विजयी मालिका खंडित! युपीने दाखवला WPL मधील पहिला पराभव

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143