Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेकिंग! विराटच्या RCBची ताकद वाढली, भारताविरुद्ध 140 धावा चोपणारा ‘हा’ खेळाडू ताफ्यात सामील

ब्रेकिंग! विराटच्या RCBची ताकद वाढली, भारताविरुद्ध 140 धावा चोपणारा 'हा' खेळाडू ताफ्यात सामील

March 18, 2023
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Royal-Challengers-Bangalore

Photo Courtesy: Twitter/RCBTweets


आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आयपीएल 16 हंगामाचा घाट 31 मार्चपासून घातला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आरसीबी संघात मोठा बदल झाला आहे. आरसीबी संघाने अचानक एका जबरदस्त खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. खरं तर, या धुरंधराला बदली खेळाडू म्हणून सामील करण्यात आले आहे.

विराट कोहलीच्या संघात मोठा बदल
माध्यमांतील वृत्तांनुसार, विराट कोहली (Virat Kohli) याच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने विल जॅक्स (Will Jacks) याचा बदली खेळाडू म्हणून न्यूझीलंडचा अष्टपैलू मायकल ब्रेसवेल (Michael Bracewell) याला ताफ्यात सामील केले आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी लिलावात त्याला खरेदीदार मिळाला नव्हता. विशेष म्हणजे, ब्रेसवेल जानेवारीमध्ये भारत दौऱ्यावर आला होता. तसेच, त्याने भारताविरुद्ध 140 धावा करत वादळी शतक ठोकले होते. त्याने गोलंदाजीतही आपली कमाल दाखवली होती.

🔊 ANNOUNCEMENT 🔊

Michael Bracewell of New Zealand will replace Will Jacks for #IPL2023.

The 32-year-old all-rounder was the top wicket taker for Kiwis during the T20I series in India, and scored a fighting 140 in an ODI game. 🙌#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/qO0fhP5LeY

— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 18, 2023

विल जॅक्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज विल जॅक्स हा नुकताच दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला आयपीएल 2023 स्पर्धेत खेळता येणार नाहीये. जॅक्स बांगलादेश दौऱ्यावर असताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला मायदेशी पाठवण्यात आले होते. मालिकेच्या दुसऱ्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना जॅक्सला डाव्या मांडीला दुखापत झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला स्कॅन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर त्याला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले आहे. टी20 क्रिकेटमध्ये विल जॅक्सची आकडेवारी चांगली आहे. त्याने 109 सामने खेळताना 29.80च्या सरासरीने 2802 धावा चोपल्या आहेत.

आरसीबीचा पहिला सामना
आयपीएल 2023 स्पर्धेतील आरसीबी (RCB) संघाचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी घरच्या मैदानावर म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स (Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians) संघात सायंकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. (big news ipl 2023 michael bracewell replace will jacks in royal challengers bangalore )

आयपीएल 2023 स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ-
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक, अनुज रावत, शाहबाज अहमद, डेविड विली, महिपाल लोमोरे, फिन एलन, सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, आकाशदीप, मायकल ब्रेसवेल, रीस टोप्ले, रंजन कुमार, अविनाश सिंग, हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, सोनू यादव.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधी राहुलला नाही तसलं बोलला भारतीय दिग्गज, आता वादळी खेळी पाहून म्हणाला, ‘दबावातही चांगला खेळलास…’
‘रोज उठा, अंघोळ करा, विलियम्सनचं कौतुक करा आणि झोपून जा’, सचिनची बरोबरी करताच भारतीय दिग्गजाकडून कौतुक


Next Post
Australian-Team-And-KL-Rahul

एका पराभवाने खचला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर; म्हणाला, 'आम्ही राहुलसारखी फलंदाजी...'

New-Zealand-Cricket

वेलिंग्टनमध्ये वादळ! विलियम्सनला जागेवर थांबताही येईना, टोप्या, हेल्मेट, चष्मे गेले उडून, पाहा व्हिडिओ

Photo Courtesy: Twitter/ICC

"तुमचेच लोक सुरक्षित नाहीत, तुम्ही काय आम्हाला सुरक्षा देणार?" पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भज्जी बरसला

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143