---Advertisement---

आर्किटेक्चर आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग । मराठवाडा कॉलेजची ब्रिकवर मात

On: शनिवार, मार्च 18, 2023 11:37 PM
---Advertisement---

पुणे: मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या संघांनी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग, शिअरफोर्स वानवडी येथील सीआरपीएफच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.

मुलांच्या गटातील फुटबॉल स्पर्धेत मराठवाडा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरवर ५-३ने मात केली. निर्धारित वेळेत ही लढत १-१ अशी बरोबरीत राहिली होती. यात लढतीच्या आठव्या मिनिटाला श्रेयस उमरानी याने गोल केला होता. मात्र, मराठवाडा संघाचा हा आनंद अधिक वेळ टिकला नाही. पुढच्याच मिनिटाला अंश अगरवालने (९ मि.) गोल करून ब्रिकला बरोबरी साधून दिली. यानंतर गोलशून्यची कोंडी काही अखेरपर्यंत फुटली नाही. त्यामुळे शूटआउटचा अवलंब करण्यात आला. यात मराठवाडा संघाकडून सिड चव्हाण, चिराग बापर्देकर आणि बेन्सन मॅथ्यूजने गोल केले, तर ब्रिककडून शुभम अगरवाल, जयेश खैरे यांनाच गोल करता आले.

यानंतर सिंहगड कॉलेज आणि भारती विद्यापीठ यांच्यातील लढत चुरशीची झाली. मात्र, दोन्ही संघांना गोल करण्याच्या समान संधी मिळाल्या. दोन्ही संघांना बचाव भेदता आला नाही. त्यामुळे निर्धारित वेळेत लढत ०-० अशी बरोबरीत राहिली. पेनल्टी शूटआउटमध्ये भारती विद्यापीठकडून इसाक शाजी, दीपककुमार, आर्यसेन काळे आणि प्रियांशू सिंग यांनी गोल केले. सिंहगड कॉलेजकडून अद्वैत सोनुने, तेजल श्वेजल आणि यश कोलटकर यांनाच गोल करता आले.

इतर निकाल :
व्हॉलिबॉल स्पर्धा –
मुले – मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-२३, २५-२३, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी वि. वि. प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-१५, २५-१४, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोहगाव २५-१५, २५-११, अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर १७-२५, २५-२०, २१-१९.

मुली – डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी वि. वि. अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-२३, २५-११.

बास्केटबॉल –
मुली – डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ५०-१८, डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी ३५-१३.स्पर्धेतील फुटबॉलमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
(Architecture Intercollegiate Sports League. Marathwada College beat Brick)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डिवाईनच्या वादळात उडाली गुजरात! 189 धावांचा आरसीबीकडून यशस्वी पाठलाग 
दुःखद बातमी: इंग्लिश क्रिकेटपटूच्या चिमुकलीला देवाज्ञा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---