Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अष्टपैलू खेळी दाखवत शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा बनला पीएसएल चॅम्पियन, कायनर पोलार्डचा संघ पराभूत

अष्टपैलू खेळी दाखवत शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा बनला पीएसएल चॅम्पियन, कायनर पोलार्डचा संघ पराभूत

March 19, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Shaheen Afridi

Photo Courtesy: Twitter/cricketpakcompk


शनिवारी (19 मार्च) रात्री शाहीन आफ्रिदीने इतिहास रचला. पाकिस्तान सुपर लीगच्या दोन ट्रॉफी जिंकणारा शाहीन आफ्रिकी पहिलाच कर्णधार बनला. पीएसएल 2023 चा अंतिम सामना शनिवारी लाहोरमध्ये पार पडला. या सामन्यात लाहोर कलंदर्स आणि मुलतान सुलतान्स संघ आमने सामने होते. शाहीनच्या नेतृत्वातील लाहोरने शेवटच्या चेंडूवर विजय साकारला आणि सलग दुसरी पीएसएल ट्रॉफी जिंकली.

लाहोर कलंदर्स संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिका (Shaheen Afridi) या सामन्यातील जबरदस्त प्रदर्शनानंतर सामनावीर पुरस्काराचा मानकरी देखील ठरला. त्याने टाकलेल्या 4 षटकांमद्ये तब्बल 51 धावा दिल्या, पण महत्वाच्या 4 विकेट्सही घेतल्या. मुलतान सुलतान संघाला विजयासाठी 201 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे गाठण्यासाठी संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केला. पण अखेर लाहोर कलंदर्सने बाजी मारली. लाहोरने हा सामना अवघ्या 1 धावेने जिंकला.

शेवटच्या चेंडूवर मुलतान संघाला 4 धावांची आवश्यकता होती, स्ट्राईकवर असलेल्या खुशदिल शाहला चौकार किंवा षटकार मारता आला नाही. झमान खानने टाकलेला हा शेवटचा चेंडू खुशदिलने खेळून काढला, पण त्याने अवघ्या दोन धावांवर समाधान मानावे लागले. खेळपट्टीवरील फलंदाजांनी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण स्ट्राईकवर पोहोचण्यापूर्वीच गोलंदाजाने नॉन स्ट्राईकवर चेंडू स्टंप्सला लावला. परिणामी सामना बरोबरीने सोडवण्यासाठी मुलतानला एक धाव कमी पडली. फलंदाजांनी तिसरी धाव पूर्ण केली असती, तर चाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार पाहता आला असता.

तत्पूर्वी, लाहोर कलंदर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 200 धावा साकारल्या. सामनावीर ठरलेल्या शाहीन आफ्रिकीने फक्त गोलंदाजीतच नाही, तर फलंदाजीतही मोलाचे योगदान दिले. त्याने अवघ्या 15 चेंडूत नाबाद 44 धावा ठोकल्याने संघाची धावसंख्या 200पर्यंत पोहोचली. त्याव्यतिरिक्त वरच्या फळीत उब्दुल्हा शफीक याने 65 धांवांची महत्वपूर्ण खेळी केली. मुलतानसाठी उस्मान मीर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

From underdogs to champions 🔥

Lahore Qalandars rise to the top and claim the PSL 8 crown 👑#PSL8 #MSvLQ pic.twitter.com/lBBmJAxP05

— Cricket Pakistan (@cricketpakcompk) March 18, 2023

201 धावांचा पाठलाग करण्यासाठी मुलतान सुलतान संघ मैदानात आल्यानंतर त्यांचे सलामीवीर अपेक्षित सुरुवात करू शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रिले रुसो याने मात्र 32 चेंडूत ताबडतोड 52 धावा कुटल्या. वेस्ट इंडीजचा दिग्गज कायनर पोलार्ड अवघ्या 19 धावा करून तंबूत परतला. मुलतानसाठी प्रत्येक खेळाडूने फलंदाजीत दिलेल्या योगदानाच्या जोरावर संघ कसाबसा विजयाच्या जवळ पोहोचला. पण शेवटच्या चेंडूवर मात्र त्यांना पराभव मिळाला.
(Shaheen Afridi-led Lahore Qalandars won second PSL trophy )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आर्किटेक्चर आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग । मराठवाडा कॉलेजची ब्रिकवर मात
शतक हुकलं, पण मन जिंकलं! RCB च्या सोफी डिवाईनचा गुजरातविरुद्ध 99 धावांचा वादळी दणका


Next Post
Ellyse Perry Smriti Mandhana

WPL 2023 । एलिस पेरीकडून स्मृती मंधानाचे कौतुक, जाणून घ्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलूला काय भावले

Najam Sethi & Jay Shah

नजम सेठींची आश्चर्यकारक माहिती, 'या' बाबतीत पीएसएलने आयपीएलला टाकले मागे?

Team-India

दुसरी वनडे : नाणेफेकीचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात, भारताचा कर्णधार बदलला, पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143