Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अपयशी ठरत असलेल्या सूर्याला ‘या’ कारणाने मिळतेय संधी! स्वतः कर्णधार रोहितने केला खुलासा

March 19, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Suryakumar Yadav & Rohit Sharma vs SL

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला.‌ पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेत हा सामना 10 विकेट्सने खिशात घातला. या सामन्यात भारताचे सर्वच फलंदाज अपयशी ठरले. मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव हा सलग दुसऱ्या सामन्यात खाते खोलू शकला नाही. त्याच्यावर सगळीकडून टीका होत असताना आता कर्णधार रोहित शर्माने त्याची पाठराखण केली आहे.

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारतीय फलंदाज या संधीचा लाभ उचलू शकले नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क राच्या चार बळींमुळे भारतीय संघाचे पाच फलंदाज केवळ 49 धावांमध्ये माघारी परतले होते. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला सूर्यकुमार यादव या सामन्यात देखील पहिल्याच चेंडूवर पायचित होत पव्हेलियनमध्ये परतला. मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यातही पहिल्याच चेंडूवर स्टार्कने त्याला पायचित पकडले होते.

सूर्यकुमार याची वनडे क्रिकेटमधील कामगिरी सातत्याने खराब होतेय. 2023 मध्ये खेळलेल्या 6 वनडेत तो केवळ 49 धावा करू शकला आहे. असे असताना त्याला नियमित संधी देण्याबाबत कर्णधार रोहित शर्मा याला सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. यावर उत्तर देताना रोहित म्हणाला,

“सूर्या काय दर्जाचा फलंदाज आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्या धावा होत नाहीत याची कल्पना त्यालाही असून, गोष्टी लवकरच ठीक होतील. चांगल्या खेळाडूला सातत्याने संधी देणे गरजेचे असते. श्रेयस बाहेर असताना तो एक प्रमुख फलंदाज बनतो.”

वनडे संघाचा नियमित सदस्य असलेला श्रेयस अय्यर हा पाठीच्या दुखण्यामुळे या मालिकेत सहभागी नाही. याच कारणाने सूर्यकुमारला अधिक संधी मिळत आहे.

(Rohit Sharma Speaks On Suryakumar Yadav Form Said He Is Main Player)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दोन महिन्यांतच टीम इंडियाने पाहिले अर्श आणि फर्श! ऑस्ट्रेलियाने सोपवली वनडे इतिहासातील सर्वात मोठी हार
मार्शसमोर भारतीय गोलंदाज फेलच! आजवर वनडेत नेहमी केलीये धुलाई, पाहा ही आकडेवारी 


Next Post

महिंद्रा IBA महिला बॉक्सिंग: भारताच्या निखत झरीन आणि मनिषा उप-उपउपांत्यपूर्व फेरीत

Sisanda Magala

जेमिसनच्या जागी सिसांडा मगाला सीएसकेच्या ताफ्यात, जाणून घ्या नवख्या खेळाडूवर विश्वास दाखवण्याचे कारण

Shane-Watson

'मी अस ऐकलंय की, ही धोनीची शेवटची आयपीएल आहे...', कॅप्टन कूलविषयी काय म्हणाला शेन वॉटसन?

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143