Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन महिन्यांतच टीम इंडियाने पाहिले अर्श आणि फर्श! ऑस्ट्रेलियाने सोपवली वनडे इतिहासातील सर्वात मोठी हार

March 19, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला.‌ ऑस्ट्रेलियन संघाने मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढत यजमान संघाला 10 गडी राखून पराभूत केले. मिचेल स्टार्कने पाच बळी मिळवल्यानंतर 117 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर मिचेल मार्श व ट्रेविस हेड यांनी नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधली. मात्र, भारतीय संघासह एक दुर्दैवी योगायोग जुळून आला.

भारतीय संघ या सामन्यात मालिका जिंकण्याच्या उतरला होता. मात्र, मिचेल स्टार्कच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजी विभागाने भारतीय फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडले. स्टार्कच्या 5 बळींमुळे भारताचा डाव अवघ्या 117 धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना मिचेल मार्श व ट्रेविस हेड या दोन्ही सलामवीरांनी अर्धशतके करत संघाला दहा गडी राखून विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियन संघाने आपल्याला मिळालेले आव्हान केवळ 11 षटकांमध्ये पूर्ण केले. चेंडू राखून झालेला भारतीय संघाचा हा वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला. भारतीय संघाला 234 चेंडू राखून या पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी भारताला न्यूझीलंडकडून 212 चेंडू राखून सर्वात मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागलेले.

भारताचा हा वन डे इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. त्याचवेळी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी भारताने वनडे इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय देखील साजरा केला होता. 15 जानेवारी 2023 रोजी तिरुअनंतपुरम येथे झालेल्या वनडे सामन्यात भारताने श्रीलंकेला तब्बल 317 धावांनी मात दिली होती. त्यामुळे भारतीय संघाला आजवरचा सर्वात मोठा विजय व सर्वात मोठा पराभव हे केवळ दोन महिन्याच्या अंतरानेच पाहावे लागले.

(Indian Cricket Team Face Biggest Win And Biggest Loss In ODI Within Two Months INDvAUS)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घरच्या मैदानावर टीम इंडियाचा नामुष्कीजनक विक्रम! भारताच्या वनडे इतिहासात चौथ्यांदाच असं घडल
दुसऱ्या वनडेत टीम इंडिया चारीमुंड्या चीत! ऑस्ट्रेलियाचा अवघ्या 11 षटकात 10 विकेट्सने रेकॉर्डब्रेक विजय


Next Post
Photo Courtesy: Twitter

मार्शसमोर भारतीय गोलंदाज फेलच! आजवर वनडेत नेहमी केलीये धुलाई, पाहा ही आकडेवारी

ind VS aus

विशाखापट्टणममध्ये झाली 14 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती! गुवाहाटीत ऑस्ट्रेलियानेच दिलेली भळभळती जखम

Photo Courtesy; Twitter/Rajasthan Royals

तोच दरारा तीच दहशत! 42 व्या वर्षी हवेत झेपावत कैफने टिपला नेत्रदीपक झेल, तुम्हीही पाहा व्हिडिओ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143