---Advertisement---

10 लाखापासून सुरुवात, आता कोट्यावधी रुपयांचा मालक; पाहा याॅर्कर किंगची नेटवर्थ

On: शुक्रवार, ऑगस्ट 30, 2024 4:51 PM
Jasprit-Bumrah-And-Sanjana-Ganesan
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला जगातील महान गोलंदाजापैकी एक आहे. अलीकडेच झालेल्या टी20 विश्वचषकामध्ये त्याचे शानदार कामगिरी पहायला मिळाली होती. त्यामुळे भारतीय संघाने अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवले आणि विजेतेपदही जिंकले. तो (बुमराह) सध्या काही वेळ ब्रेकवर (विश्रांती) आहे. बुमराहने गोलंदाजीसह वेगळी ओळख पटविली आहे. कोणत्याही फलंदाजाला त्याच्या विरुद्ध खेळणे सोपे नाही. तो त्याच्या खेळासह कमाईच्या बाबतीत बर्‍याच खेळाडूंवर भारी आहे.

‘याॅर्कर किंग’ नावाने प्रसिध्द असलेला बुमराह भारतामध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्यांपैकी क्रिकेटरपैकी एक आहे. 2016 मध्ये भारतीय संघात पदार्पण करणारा जसप्रीत बुमराह आता तीनही फाॅरमॅटमध्ये संघाचा अविभाज्य घटक बनला आहे. जसप्रीत बुमराहने 2013 मध्ये मुंबई इंडिन्ससोबत आपल्या आयपीएल प्रवासाला सुरुवात केली होती. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. अहवालानुसार, बुमराहची आताच्या घडीची एकूण संपत्ती (नेटवर्थ) सुमारे 7 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 55 कोटी आहे.

जसप्रीत बुमराहच्या कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे टीम इंडिया आणि आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सकडून मिळणारी फी आहे. याव्यतिरिक्त तो अनेक ब्रँडच्या जाहरितीमधून लाखो रुपयांची कमाई करतो. तसेच बीसीसीआयच्या ए+ ग्रेडमध्ये बुमराह हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. वार्षिक कराराअंतर्गत त्याला 7 कोटी रुपये मिळतात. या व्यतिरिक्त भारतीय संघाकडून सामने खेळण्यासाठी स्वतंत्र फी देखील दिली जाते. जे की प्रति कसोटी सामन्याला 15 लाख, एकदिवसीय सामन्याला 6 लाख आणि टी20 मध्ये 3 लाख रुपये मिळतात.

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये एक हंगाम खेळण्यासाठी बुमराहला फ्रँचायझीमधून 12 कोटी रुपये मिळतात. त्याने आयपीएलमध्ये फक्त 10 लाख रुपयांपासून सुरुवात केली होती. आता त्याने आयपीएलपासून आतापर्यंत 50 कोटी पेक्षा जास्त रुपये कमावले आहेत. अहवालानुसार, तो एका दिवसाच्या ब्रँडच्या समर्थनासाठी 1.5 ते 2 कोटी शुल्क आकारतो. अहमदाबाद आणि मुंबईत त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांचे घरे आहेत. या व्यतिरिक्त त्याच्याकडे मर्सिडीज मॅयबॅक एस 560, निसान जीटी-आर, रेंज रोव्हर वेलर, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि ह्युंदाई वेरना यांसारख्या कार आहेत.

हेही वाचा-

पाकिस्तानची टीम भीकेला; खेळाडूंना द्यायला पैसे नाहीत, कर्ज घेऊन काढलं विमानाचं तिकीट
Champion’s Trophy: “भारतानं पाकिस्तानात येऊ नये” पाकिस्तानी खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य
“आय लव्ह…”, हार्दिक पांड्याच्या प्रेमात वेडी ही अभिनेत्री, उघडपणेच व्यक्त केली…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---