गुरुवार 4 आॅक्टोबरपासून भारत विरुद्ध विंडिज या संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकण्याची संधी आहे.
विराटने आत्तापर्यंत विंडिजविरुद्ध कसोटीत 10 सामन्यात 38.61 च्या सरासरीने 502 धावा केल्या आहेत. यात 200 धावा ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे.
त्यामुळे त्याने गुरुवारी सुरु होणाऱ्या विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत 38 धावा केल्या तर तो विंडिज विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अझरुद्दीनला मागे टाकेल.
अझरुद्दीनने विंडिजविरुद्ध कसोटीत 14 सामन्यात 28.36 च्या सरासरीने 539 धावा केल्या आहेत. तो विंडिज विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत 20 व्या स्थानी आहे.
या यादीत भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर अव्वल क्रमांकावर आहेत. त्यांनी विंडिज विरुद्ध कसोटीत 2746 धावा केल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर 1978 धावांसह राहुल द्रविड आणि 1715 धावांसह व्हीव्हीएस लक्ष्मण तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारत आणि विंडिज संघात आत्तापर्यंत 94 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 30 कसोटीत विंडीज विजयी झाले आहेत तर 18 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच 46 सामने अनिर्णित राहिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–करुण नायरला संघात संधी न दिल्याने हरभजन सिंगची निवड समितीवर कठोर शब्दात टिका
–माजी कर्णधार एमएस धोनीबरोबर घडला विलक्षण योगायोग
-५० कसोटी खेळलेला पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू करतोय पुनरागमन