प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, त्यांनी भारतीय संघासाठी खेळावे. अनेक खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. काहींनी त्या संधीचे सोने केले, तर काहींना त्या संधीचा उपयोग करता आला नाही. कधी- कधी काही खेळाडूंच्या चांगल्या प्रदर्शनानंतरही त्यांना वगळण्यात आले आहे आणि त्यांना परत संघांत स्थानही दिले गेले नाही.
भारताचे माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद हे सध्या माध्यमांमध्ये जास्त चर्चेत आहेत. अलीकडच्या काही दिवसात एमएसके प्रसाद यांनी त्या मुद्द्यांवर आपले मत वक्तव्य करताना मौन तोडले. ज्यावर त्यांच्या कार्यकाळात बरेच वाद झाली होते. पुन्हा एकदा त्यांनी मोठे विधान केले आहे. यावेळी एमएसके प्रसादने तमिळनाडूचा सलामीवीर फलंदाज अभिनव मुकुंदवर मत व्यक्त करताना, मान्य केले की त्यांच्या कार्यकाळात या फलंदाजाला अधिक संधी द्यायला पाहिजे होत्या.
एमएसके प्रसाद यांनी अभिनव मुकुंदबद्दल दिलगिरी व्यक्त केली
भारताचे माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी मान्य केले आहे की, तमिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंद याला त्यांच्या कार्यकाळात अधिक संधी मिळायला हव्या होत्या. मुकुंद घरगुती क्रिकेटमध्ये बऱ्याच धावा करत होता आणि त्याने एका कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या डावाची सुरुवातही केली आहे. त्यानंतर त्याला निवडकर्त्यांकडून दुर्लक्षित केले गेले.
एमएसके प्रसाद क्रिकबझ प्लसशी बोलताना म्हणाले, “अभिनव मुकुंदबद्दल मला खूप वाईट वाटते. जेव्हा मी झोपता, तेव्हा ही चिंतांपैकी एक गोष्ट आहे. मला असे वाटते की, आम्ही त्याला अजून संधी दिल्या पाहिजे होत्या. त्याने घरगुती क्रिकेटमध्ये आणि भारत अ कडून उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.”
अभिनव मुकुंदचे पुनरागमन सध्या आहे कठीण
अभिनव मुकुंदने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टन येथे भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. यानंतर त्याने शेवटचा कसोटी सामना सन २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध गाले येथे खेळला होता. त्याने फक्त ७ कसोटी सामने खेळले आहेत. गेल्या चार वर्षांपासून तो संघाबाहेर आहे. वयाच्या ३१व्य वर्षी अभिनवला पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांच्यासारखे खेळाडू असताना संघात स्थान मिळवणे कदाचित अशक्य आहे.
सध्याच्या काळात रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल हे दोघे भारतीय संघाचा भाग आहेत, त्यामुळे अभिनवला सलामीवीर म्हणून भारतीय संघात खेळणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत, एमएसके प्रसाद यांना वाटते की, तामिळनाडूच्या डाव्या हाताच्या या फलंदाजाला अधिक संधी मिळायला हव्या होत्या आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा ते त्याच्याबद्दल विचार करतात, तेव्हा त्यांना असेच वाटते.
एमएसके प्रसाद आहेत खूपच चर्चेत
भारतीय संघाचे माजी मुख्य निवडकर्ता असलेले एमएसके प्रसाद यांनी आपल्या कारकिर्दीत असे अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांना अजूनही टीकेचा सामना करावा लागला आहे. अलीकडे आपल्या वक्तव्यांद्वारे त्यांनी अनेक विषयांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वीच एमएसके प्रसाद म्हणाले होते की, त्यांनी आपल्या कार्यकाळात भारतीय क्रिकेटचे भविष्य लक्षात घेऊन काही खेळाडूंसाठी कठोर निर्णय घेतले होते. याशिवाय फारुख इंजिनीअरने अनुष्का शर्मावर चहा पिण्याबद्दल दिलेल्या विधानावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
युजवेंद्र चहलच्या पत्नीने केला ‘विरुष्का’सोबतचा फोटो शेअर; अनुष्काबद्दल बोलताना म्हणाली, ‘ती खूप…’
जेव्हा अव्वल गोलंदाज राशिदने खाल्ला होता सपाटून मार, इंग्लंडच्या फलंदाजांनी ठोकले होते ११ षटकार
धोनीने तुझी कारकिर्द संपुष्टात आणली? चाहत्याच्या प्रश्नावर सेहवागने दिले होते ‘असे’ उत्तर