दुबई। आज 14 व्या एशिया कपमधील सुपर फोरमध्ये भारताचा अफगाणिस्तानबरोबर सामना होत आहे. या सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी भारताचे नेतृत्व करणार आहे.
त्याने जानेवारी 2017 मध्येच भारतीय संघाच्या मर्यादित षटकांचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर विराट कोहलीकडे भारताची धूरा सोपवली आहे. तसेच धोनीने 2014 मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.
पण आज एशिया कपमधील भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शिखर धवनने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धोनी भारताचे नेतृत्व करणार आहे. तो जवळ जवळ एक वर्षांनंतर भारताचे नेतृत्व करणार आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताने महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली आहे. यात रोहित, शिखर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली आहे.
त्यांच्या ऐवजी केएल राहुल, दिपक चहर, खलील अहमद, सिद्धार्थ कौल आणि मनिष पांडे या खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच हा सामना दिपक चहरचा पहिला वनडे सामना आहे. तो या सामन्यातून वनडे क्रिकेटमधून पदार्पण करणार आहे.
धोनीचा हा वनडे कर्णधार म्हणून 200 वा सामना असणार आहे. त्याने या सामन्याआधी 199 वनडे सामन्याच नेतृत्व केले होते. यामध्ये त्याने 110 विजय, 74 पराभव आणि 4 सामने बरोबरीचे तर 11 सामने हे अनिर्णित राहिले होते.
तसेच तो सर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व करणारा पहिला आशियाई क्रिकेटपटू आहे. तसेच तो २०० वनडे सामन्यात नेतृत्व करणारा तो जगातील तिसरा कर्णधार ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या –
–रोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित
–म्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल