वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघ आता मायदेशात श्रीलंका संघविरुद्ध टी२० मालिका (India vs Sri Lanka T20 Series) आणि कसोटी खेळणार आहे. टी२० मालिकेचा पहिला सामना २४ फेब्रुवारीला लखनऊच्या एकना स्टेडियमवर होणार असून त्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू लखनऊला पोहोचले आहेत.
बीसीसीआयने रोहित शर्माच्या(rohit sharma) नेतृत्वाखालील संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघही जाहीर झाला आहे. संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सहभागी नसल्यामुळे गेल्या आठवड्यातच तो लखनऊला पोहोचला होता. लखनऊमध्ये पोहचल्यानंतर भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने इशान किशनसोबतचा एक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे आणि लिहले आहे की, ‘हसा तुम्ही लखनऊमध्ये आहात.’
Indian Team Has Reached Lucknow pic.twitter.com/IMfZ0VFgDG
— Gay Shah (@gayshah_popa) February 21, 2022
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना लखनऊमध्ये होणार आहे. यानंतर मालिकेतील दोन्ही सामने धर्मशाला येथे होणार आहेत. वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका खेळण्यासाठी तयार झाला आहे. तर श्रीलंका संघाला नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेत १-४ असा पराभव पत्करावा लागला आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला जाणार असून हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. दुसरा सामना २६ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारीला धर्मशाला येथे खेळले जाणार आहेत. यानंतर या दोन संघांमध्ये कसोटी मालिका खेळली जाणार ाहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान.
भारतीय संघाने नुकतेच वेस्ट इंडिजला एकदिवसीय आणि टी२० या दोन्ही मालिकामध्ये पराभूत केले आहे. एकदिवसीय मालिकेत भारताने ३-० ने विजय मिळवला आणि टी२० मालिकेत सुद्धा ३-० ने सामना जिंकला. आता श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मालाच कर्णधार बनवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर एक दिवसही थांबले नाहीत पाहुणे, त्वरित परतले स्वदेशी
यूपी योद्धांपुढे पुणेरी पलटणचे नामोहरम, ११ गुणांनी सामना जिंकत उपांत्य फेरीत दिली धडक
कर्णधार धोनीची वाढली डोकेदुखी! सीएसकेने १४ कोटी मोजलेला खेळाडू हंगामातून होऊ शकतो बाहेर