भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या सध्या आयपीएल २०२२ मध्ये जबरदस्त प्रदर्शन करत आहे. दुखापतीमुळे बरेच महिने क्रिकेटपासून दूर झालेल्या हार्दिकवर सध्या गुजरात टायटन्स संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरातचा संघ दमदार प्रदर्शन करत असून त्यांनी आतापर्यंत ७ पैकी ६ सामने जिंकले आहेत. केवळ कर्णधार म्हणूनच नव्हे तर फलंदाज म्हणूनही त्याचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे.
यानंतर आगामी टी२० विश्वचषकासाठी (T20 World Cup) हार्दिकचे (Hardik Pandya) भारतीय संघातील (Team India) स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. आता याबद्दल हार्दिकने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
हार्दिकने आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत ६ सामने खेळताना ७३.७५ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. त्याने हे ६ सामने खेळताना ३ अर्धशतकांच्या मदतीने २९५ धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात मांडीला दुखापत झाल्यामुळे तो खेळू शकला नव्हता.
या सामन्यानंतर भारतीय संघातील आपल्या पुनरागमनाबद्दल बोलताना (Hardik Pandya On Comeback In Team India) हार्दिकने म्हटले आहे की, “सर्वात आधी तर मला असे वाटते की, भारतीय संघात जागा मिळवणे किंवा नाही, हे माझ्या हातात नाही. दुसरे म्हणजे, मी अजिबात माझ्या भारतीय संघातील पुनमरागमनाबद्दल विचार करत नाहीय. मी ज्या सामन्यात खेळतो, त्याच सामन्यावर जास्त लक्ष केंद्रित करत असतो.”
हार्दिकने नोव्हेंबर २०२१ मध्ये दुबईतील टी२० विश्वचषकात नामिबियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. परंतु तो पाठीच्या सर्जरीमुळे गोलंदाजीसाठी झगडत होता. मात्र आता आयपीएलमधून (IPL 2022) त्याने जबरदस्त पुनरागमन केले आहे.
संघाच्या प्रदर्शनावर आनंदी आहे
गुजरात टायटन्सच्या प्रदर्शनाबाबत बोलताना हार्दिक म्हणाला की, “सध्या मी आयपीएल खेळत आहे आणि माझे संपूर्ण लक्ष आयपीएलवरच आहे. पुढे पाहूया माझे भविष्य कुठे घेऊन जाते. आम्ही सध्या चांगले खेळत आहोत आणि मी त्यामध्ये खूश आहे. असे असले तरीही, आम्ही सर्व सामने शेवटच्या षटकात जिंकत आहोत. ही गोष्ट आम्हाला मान्य करावी लागेल.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘आम्ही मोठी धावसंख्या उभारू शकलो असतो, पण…’, आरसीबीच्या कर्णधाराने सांगितली कुठे झाली चूक
मोठी बातमी! ‘या’ ठिकाणी खेळला जाणार आयपीएल २०२२चा अंतिम सामना; दर्शकांना १०० टक्के क्षमतेने एन्ट्री