Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हार्दिक पंड्याची गाडी काही थांबेना! हंगामातील सलग तिसऱ्या अर्धशतकामुळे ‘या’ यादीत ठरला ‘टॉपर’

हार्दिक पंड्याची गाडी काही थांबेना! हंगामातील सलग तिसऱ्या अर्धशतकामुळे 'या' यादीत ठरला 'टॉपर'

April 24, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Hardik-Pandya

Photo Courtesy: iplt20.com


शनिवारच्या (२३ एप्रिल) डबल हेडरचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने ८ धावांनी विजय मिळवला. मिळालेल्या विजयात हार्दिकने केलेल्या ६७ धावांचे योगदान बहुमूल्य राहिले. या खेळीनंतर तो आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार देखील बनला.

चालू आयपीएल हंगामात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) त्याच्या जुन्या अंदाजात पुन्हा परतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने केकेआरविरुद्धच्या सामन्यात केकेले अर्धशतक हे चालू हंगामातील त्याचे सलग तिसरे अर्धशतक ठरले. या सामन्यात केकेल्या ६७ धावांसाठी त्याने ४९ चेंडू खेळले आणि यामध्ये २ षटकार तसेच ६ चौकार ठोकले. या खेळीनंतर तो सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. त्याने लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) मागे टाकत यादीत पहिले स्थान पटकावले आहे. राहुलच्या नावावर २६५ धावा आहेत, तर हार्दिकने २९५ धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आहे. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना त्यांचा संघाने ९ विकेट्सच्या नुकसानावर १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआर मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १४८ धावा करू शकला. परिणामी गुजरातने ८ धावांनी हंगामातील त्यांचा सहावा विजय नोंदवला. गुणतालिकेत सध्या गुजरातचा संघ १२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसरीकडे केकेआर ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.

आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार
२९५ धावा- हार्दिक पंड्या*

२६५ धावा- केएल राहुल
२५० धावा- फाफ डू प्लेसिस
२३६ धावा- श्रेयस अय्यर
२०१ धावा- संजू सॅमसन

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

मागील ५ वर्षात आरसीबीसाठी २३ एप्रिल दोनदा ठरलाय काळा दिवस, टाका आकडेवारीवर एक नजर

विराटचा खराब फॉर्म सुरूच! हंगामात दुसऱ्यांदा, तर आयपीएल कारकिर्दीत ‘एवढ्या’ वेळा झाला गोल्डन डकवर बाद

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आयपीएलनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी करणार दोन हात; वेळापत्रक जाहीर


ADVERTISEMENT
Next Post
Virat-Kohli-RCB

'विराटच्या करिअरमध्ये इतकी वाईट वेळ येईल असं वाटलं नव्हतं', कोहलीच्या खराब कामगिरीवर माजी दिग्गजाचे मोठे विधान

Photo Courtesy: Twitter/ICC

सचिन तेंडूलकर आणि क्रिकेटवर्तुळात गाजलेले ५ वाद

Photo Courtesy: Twitter/ICC

वाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.