शनिवारी (दि. २३ एप्रिल) आयपीएलच्या मैदानात डबल हेडर सामने खेळले गेले. पहिला सामना दुपारच्या वेळी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने ८ धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल जोपर्यंत खेळपट्टीवर उपस्थित होता, तोपर्यंत केकेआरच्या चाहत्यांना विजयाची अपेक्षा होती, पण रसेलने विकेट गमावल्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या.
तब्बल १५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने चांगले प्रदर्शन केले, पण शेवटच्या षटकात आंद्रे रसेल (Andre Russell) याची विकेट मिळाल्यामुळे गुजरात टायटन्सला सामना जिंकता आला. शेवटच्या षटकात केकेआरला १७ धावांची आवश्यकता होती. स्ट्राईकवर असलेल्या आंद्रे रसेलने पहल्याच चेंडूला हवाई मार्गे सीमारेषेबाहेर पाठवले. त्यानंतर पाच चेंडूत केकेआरला ११ धावांची गरज राहिली होती. आंद्रे रसेल तोपर्यंत चांगलाच सेट झाला होता आणि त्याला स्वतःवर पूर्ण विश्वास देखील होता. परंतु गुजरातचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ (Alzarri Joseph) याने दुसऱ्या चेंडूवर सामन्याचे चित्र पालटवले.
पहिल्या चेंडूवर षटकार मिळाल्यानंतर जोसेफने दुसरा चेंडू शॉर्ट टाकला आणि आंद्रे रसेलला तो व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही. रसेलने या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला खरा, पण सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या लॉकी फर्ग्युसनच्या हातात झेलबाद झाला. फर्ग्युसनने घेतलेल्या या झेलसाठी त्याचे चांगलेच कौतुक केले गेले. उलट्या दिशेने धावत झेल घेणे तसे कठीणच असते, पण फर्ग्युसनने या विकेट्सने महत्व जाणून अचूक झेल पकडला आणि त्याच वेळी केकेआरच्या हातातून सामना देखील निसटला.
रसेल बाद झाल्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रसेलची विकेट गमावल्यानंतर टीम साऊदी खेळपट्टीवर आला. साऊदीने एक धाव घेतली आणि उमेश यावदला स्ट्राईक दिली. पुढच्या तीन चेंडूत उमेश फक्त २ धावा करू शकला आणि परिणामी केकेआरला ८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रसेलने सामन्यात फक्त फलंदाजी नाही, तर गोलंदाजीही जबरदस्त केली. गुजरातच्या फलंदाजीवेळी शेवटच्या षटकात रसेलने तब्बल चार विकेट्स घेतल्या आणि त्यांना मर्यादित धावसंख्येवर रोखले.
A screamer from Lockie Ferguson!
Dangerous Russell departs for 48 and that should be game for GT.#IPL2022 #KKRvsGT #GTvKKR pic.twitter.com/RnxMwTJADh— Ashmin Aryal (@AryalAshmin) April 23, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीला गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. २० षटकात गुजरातने ९ विकेट्सच्या नुकसानावर १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरला ८ विकेट्सच्या नुकसानावर १४८ धावा करता आल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नो बॉल वादावर राजस्थानच्या प्रशिक्षकांनी सोडले मौन; म्हणाले, ‘पंच खेळाला नियंत्रित करतात’
आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ, गुजरातचा शेवटच्या षटकात रोमांचक विजय
Video: अवघे काही मीटर कमी पडले, नाहीतर बटलरने वानखडे स्टेडियमच्या बाहेर मारला असता षटकार