Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ, गुजरातचा शेवटच्या षटकात रोमांचक विजय

आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ, गुजरातचा शेवटच्या षटकात रोमांचक विजय

April 23, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Gujarat-Titans

Photo Courtesy: iplt20.com


इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ३५वा सामना शनिवारी (दि. २३ एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे पार पडलेल्या या सामन्यात गुजरात संघाने शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवला. त्यांनी ८ धावांनी सामना खिशात घातला. या विजयाचा शिल्पकार हार्दिक पंड्या ठरला. 

या सामन्यात गुजरात (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरातने यावेळी निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १५६ धावा केल्या होत्या. हे आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता (Kolkata Knight Riders) संघाला ८ विकेट्स गमावत १४८ धावाच करता आल्या. त्यामुळे कोलकाताला हंगामातील सलग चौथा सामना गमवावा लागला.

आंद्रे रसेलची फटेकाबीज व्यर्थ
कोलकाताकडून खेळताना आंद्रे रसेलने (Andre Russell) सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला. त्याने २५ चेंडूत ४८ धावा चोपल्या. यामध्ये १ चौकार आणि ६ षटकार मारले. मात्र, त्याची ही फटकेबाजी व्यर्थ ठरली. याव्यतिरिक्त रिंकू सिंगने ३५ धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला आपल्या संघासाठी खास कामगिरी करता आली नाही. एकानेही २० धावांचा आकडा पार केला नाही. कर्णधार श्रेयस अय्यरही १२ धावांवर तंबूत परतला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी चांगली कामगिरी केली. या तिघांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, अल्झारी जोसेफ आणि लॉकी फर्ग्युसन यांनीही प्रत्येकी १ विकेट आपल्या खिशात घातली.

Chant after us: Jeetega bhai Jeetega, 𝑮𝑻 𝒋𝒆𝒆𝒕𝒆𝒈𝒂! 💙#SeasonOfFirsts #AavaDe #KKRvGT pic.twitter.com/OnPG2ztppy

— Gujarat Titans (@gujarat_titans) April 23, 2022

कर्णधार हार्दिक पंड्याची झुंजार अर्धशतकी खेळी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाकडून कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४९ चेंडूत ६७ धावा चोपत अर्धशतक झळकावले. यामध्ये २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. तसेच, डेविड मिलरने २७ आणि वृद्धिमान साहाने २५ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना २० धावांचाही आकडा पार करता आला नाही. राशिद खान आणि लॉकी फर्ग्युसन शून्य धावसंख्येवर बाद झाले. मात्र, पंड्या, मिलर आणि साहाच्या फलंदाजीमुळे गुजरातला १५६ धावांचा डोंगर उभा करता आला, जो गुजरातला पार करता आला नाही.

यावेळी कोलकाताकडून गोलंदाजी करताना आंद्रे रसेलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने १ षटकात ५ धावा देत ४ विकेट्स घेण्याची किमया केली. त्याच्याव्यतिरिक्त टीम साऊदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच, उमेश यादव आणि शिवम मावी यांनीही १ विकेट घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

या विजयासह गुजरात संघ पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे कोलकाता संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी घसरला आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

DC vs RR। वातावरण इतकं तापलं तरीही तिसऱ्या पंचांकडे का गेला नाही निर्णय? जाणून घ्या एका क्लिकवर

डेविड वॉर्नरने हद्दच पार केली! आऊट झाल्यानंतर केली अशी कृती, Video पाहून घ्या समजून

IPL 2022 | प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील का चेन्नई आणि मुंबई संघ? जाणून घ्या उभय संघांची समीकरण


ADVERTISEMENT
Next Post
Rashid-Khan

भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडणाऱ्या राशिद खानच्याच नावावर नकोशा विक्रमाची नोंद; मॅक्सवेलशी केली बरोबरी

Kumar-Sangakara

नो बॉल वादावर राजस्थानच्या प्रशिक्षकांनी सोडले मौन; म्हणाले, 'पंच खेळाला नियंत्रित करतात'

Ben-Stokes-England

इंग्लंडचा पुढील कसोटी कर्णधार बनण्याच्या बातम्यांवर स्टोक्सची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, 'मी एवढंच सांगेल की...'

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.