Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकच षटक टाकले पण जबरदस्त टाकले! रसेलने विसाव्या ओव्हरमध्ये घेतल्या चक्क ४ विकेट्स, केला वर्ल्ड रेकॉर्ड

एकच षटक टाकले पण जबरदस्त टाकले! रसेलने विसाव्या ओव्हरमध्ये घेतल्या चक्क ४ विकेट्स, केला वर्ल्ड रेकॉर्ड

April 23, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Andre-Russell

Photo Courtesy: iplt20.com


इंडियन प्रीमियर लीगमध्ये फलंदाजांबरोबरच गोलंदाजांचीही चांगलीच दहशत पाहायला मिळाली आहे. सध्या भारतात चालू असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. शनिवारी (२३ एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२२मधील ३५ वा सामना झाला. या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्सच्या नुकसानावर १५६ धावा केल्या. या डावादरम्यान कोलकाताकडून अष्टपैलू आंद्रे रसेल याने दमदार प्रदर्शन करत कमालीची कामगिरी आपल्या नावावर केली आहे.

गुजरातकडून एकटा कर्णधार हार्दिक पंड्याने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४९ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६७ धावा फटकावल्या. परंतु त्याच्याव्यतिरिक्त गुजरातकडून इतर फलंदाजांनी कोलकाताच्या गोलंदाजांपुढे नांग्या (KKR vs GT) टाकल्या. त्यातही ३३ वर्षीय रसेलने (Andre Russell) एकाच षटकात गुजरातच्या तब्बल ४ फलंदाजांची विकेट घेतली. विशेष म्हणजे, त्याने पूर्ण डावादरम्यान केवळ १ षटक फेकले आणि त्यादरम्यान त्याने ही कमाल केली आहे.

रसेलने गुजरातच्या डावातील शेवटचे विसावे षटक टाकताना अभिनव मनोहरला पहिल्या चेंडूवर झेलबाद केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने लॉकी फर्ग्युसनला पुढच्याच चेंडूवर पव्हेलियनला धाडले. अखेर पाचव्या चेंडूवर राहुल तेवतिया आणि सहाव्या व अखेरच्या चेंडूवर यश दयालला बाद करत ४ विकेट्सचा आकडा गाठला. यासह तो ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये फक्त १ षटक गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेणारा (Four Wickets In An Over) पहिलाच गोलंदाज बनला (Four Wickets in his Only Over of Match) आहे. 

याखेरीज आयपीएलमध्येही एका षटकात ४ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही त्याने आपले नाव जोडले आहे. त्याच्यापूर्वी युझवेंद्र चहल आणि अमित मिश्रा यांनीही आयपीएलमध्ये हा पराक्रम केला आहे. मिश्राने सर्वप्रथम २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध हा पराक्रम केला होता. तसेच चहलने चालू हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ही कमाल केली होती.

आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
४ विकेट्स- अमित मिश्रा (विरुद्ध पुणे वॉरिअर्स इंडिया, २०१३)
४ विकेट्स- युझवेंद्र चहल (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २०२२)
४ विकेट्स- आंद्रे रसेल (विरुद्ध गुजरात टायटन्स, २०२२)*

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

बटलर आहे कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये, आवडच्या स्टेडियमवर सलामीवीराने केला खुलासा

Video: अवघे काही मीटर कमी पडले, नाहीतर बटलरने वानखडे स्टेडियमच्या बाहेर मारला असता षटकार

चीटर, चीटर…! पंचांच्या निर्णयावरून दर्शकांचाही हिरमोड, अशाप्रकारे केला विरोध; व्हिडिओ आहे चर्चेत


ADVERTISEMENT
Next Post
Gujarat-Titans

आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ, गुजरातचा शेवटच्या षटकात रोमांचक विजय

Rashid-Khan

भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडणाऱ्या राशिद खानच्याच नावावर नकोशा विक्रमाची नोंद; मॅक्सवेलशी केली बरोबरी

Kumar-Sangakara

नो बॉल वादावर राजस्थानच्या प्रशिक्षकांनी सोडले मौन; म्हणाले, 'पंच खेळाला नियंत्रित करतात'

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.