Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेला बटलर म्हणतोय, ‘आयुष्यातील सर्वात चांगल्या फॉर्मचा आनंद घेतोय’

आयपीएलमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेला बटलर म्हणतोय, 'आयुष्यातील सर्वात चांगल्या फॉर्मचा आनंद घेतोय'

April 24, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Jos-Buttler-Century

Photo Courtesy: iplt20.com


जोस बटलर याच्या शतकी खेळीच्या जोरावर शुक्रवारी (२२ एप्रिल) राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला १५ धावांनी पराभूत केले. आता राजस्थानचा संघ १० गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. इंग्लंडचा सलामीवीर बटलर चालू आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने हंगामातील स्वतःचे तिसरे शतक ठोकले. यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बटलरने खास प्रतिक्रिया दिली.

बटलरने दिल्लीविरुद्ध खेळताना ६५ चेंडूंचा सामना केला. यामध्ये त्याने ९ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ११५ धावा ठोकल्या. सामनावीर निवडले गेल्यानंतर मुलाखतीत जोस बटलर (Jos Buttler) म्हणाला की, “मी आनंद घेतला. मला हे स्टेडियम खूप आवडते. माझी पहिली आयपीएल याच ठिकाणी मुंबई इंडियन्ससोबत झालेली. मी माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या फॉर्मचा आनंद घेत आहे. मी हा फॉर्म पुढेही कायम ठेवण्याची गरज आहे. चेंडू पहिल्या षटकात स्विंग झाला आणि थोडी अडचण देखील निर्माण झाली. तुम्ही हा दबाव झेलणे आणि त्यातून बाहेर निघणे गरजेचे असते. एकदा तुम्ही हे पार केले, तर आत्मविश्वास पुन्हा तयार होतो.”

उभय संघातील या सामन्यात राजस्थानसाठी सलामीवीर जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी पार पाडली. पडिक्कलने वैयक्तिक ५४ धावा साकारल्या. दिल्लीविरुद्ध हे दोघे ज्या रणनीतीसह मैदानात आले होते, त्याच देखील बटलरने खुलासा केला. “आम्ही चांगली भागीदारी करू शकलो. देवदत्त दुसऱ्या बाजूने चांगला खेळला. आम्ही आक्रमण करण्याचा आणि दिल्लीवर दबाव तयार करण्याचा निर्णय घेतला होता,” असे बटलर पुढे बोलताना म्हणाला.

दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर राजस्थानला प्रथम फलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २ विकेट्सच्या नुकसानावर २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला हे लक्ष्य गाठता आले नाही. मर्यादित २० षटकांमध्ये दिल्लीने ८ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या आणि १५ धावांनी पराभव स्वीकारला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

दिल्ली- राजस्थान सामन्यातील ‘नो बॉल’मुळे चांगलाच पेटला पंत; मॅक्सवेलने मीम शेअर करत विचारला प्रश्न

IPL 2022 | प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील का चेन्नई आणि मुंबई संघ? जाणून घ्या उभय संघांची समीकरणे

IPL 2022| शतक केलं बटलरने आणि निशाण्यावर आला विराट, मीम्स सोशल मीडियावर व्हायरल


ADVERTISEMENT
Next Post
Andre-Russell

एकच षटक टाकले पण जबरदस्त टाकले! रसेलने विसाव्या ओव्हरमध्ये घेतल्या चक्क ४ विकेट्स, केला वर्ल्ड रेकॉर्ड

Gujarat-Titans

आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ, गुजरातचा शेवटच्या षटकात रोमांचक विजय

Rashid-Khan

भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडणाऱ्या राशिद खानच्याच नावावर नकोशा विक्रमाची नोंद; मॅक्सवेलशी केली बरोबरी

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.