---Advertisement---

IPL 2022| शतक केलं बटलरने आणि निशाण्यावर आला विराट, मीम्स सोशल मीडियावर व्हायरल

Jos-Buttler-Memes
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शुक्रवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने अखेरच्या षटकांत १५ धावांनी विजय मिळवला. राजस्थानच्या विजयात सलामीवीर फलंदाज जोस बटलर याने मोठा वाटा उचलला. त्याने शतकी खेळी केली. त्यामुळे त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत असून सोशल मीडियावर मीम्सही व्हायरल होत आहेत. 

बटलरचे तिसरे शतक
या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी केली. राजस्थानकडून (Rajasthan Royals) सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या बटलरने (Jos Buttler) ६५ चेंडूत ९ चौकार ९ षटकारांसह ११६ धावांची खेळी केली. हे त्याचे आयपीएल २०२२ हंगामातील तिसरे शतक होते, तर आयपीएल स्पर्धेतील चौथे शतक होते.

बटलर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएलच्या १५ व्या हंगामात (IPL 2022) आत्तापर्यंत ७ सामन्यांत ८१.८३ च्या सरासरीने ४९१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ शतकांसह २ अर्धशतकांचाही समावेश आहे.

मीम्स व्हायरल
बटलरने आयपीएल २०२२ हंगामात गेल्या ७ सामन्यांत तीनवेळा शतकी खेळी केली असल्याने त्याचे खूप कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत (Social Media Reaction after Jos Buttler 4th Century in IPL). भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यानेही एक मीम शेअर केले असून त्यावर लिहिले आहे की, ‘रोज उठा, अंघोळ करा, जोस बटलरचे कौतुक करा आणि झोपून जा.’

या व्यतिरिक्त एका युजरने एक मीम शेअर केले ज्यात लिहिले आहे की, ‘हे तर माझे रोजचे काम आहे.’ तसेच गेल्या २ वर्षांपासून शतकाच्या प्रतिक्षेत असलेल्या विराटलाही यावेळी अनेकांनी ट्रोल केले आहे. याशिवाय देखील अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/Im_TonY2001/status/1517527988190908417

https://twitter.com/prabhas_mania17/status/1517554931493851137

राजस्थानचा विजय 
या सामन्यात (DC vs RR) राजस्थानने जोस बटलरच्या ११६ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत २ बाद २२२ धावा उभारल्या. राजस्थानकडून बटलरव्यतिरिक्त देवदत्त पडीक्कलने ५४ धावांची खेळी केली, तर संजू सॅमसनने नाबाद ४६ धावांची खेळी केली. दिल्लीकडून खलील अहमद आणि मुस्तफिजूरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून रिषभ पंतने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तसेच पृथ्वी शॉ आणि ललीत यादवने प्रत्येकी ३७ धावांची खेळी केली. तसेच अन्य फलंदाजांनीही छोटेखानी खेळी केल्या. अखेरीस रोवमन पॉवेलेने आक्रम खेळ करताना १५ चेंडूत ५ षटकारांसह ३६ धावा केल्या. मात्र, दिल्लीला २० षटकांत ८ बाद २०७ धावाच करता आल्या. राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘नक्कीच ते बरोबर नव्हते’, पंतने मान्य केली चूक, तर नो बॉल वादाबद्दल सॅमसन म्हणाला…

DC vs RR। शेवटच्या षटकात भलताच राडा, कर्णधार पंतने चालू सामन्यात केलेला फलंदाजांना मैदान सोडण्याचा इशारा

संपूर्ण हंगाम खेळून जे भल्याभल्यांना जमत नाही, ते बटलरने अवघ्या ७ सामन्यात केले; पाहा ‘बॉस’चा भीमपराक्रम!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---