Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल २०२२च्या खाणीतून टीम इंडियाला मिळाले ‘हे’ ३ हिरे; आगामी टी-२० विश्वचषकात मिळवू शकतात स्थान

आयपीएल २०२२च्या खाणीतून टीम इंडियाला मिळाले 'हे' ३ हिरे; आगामी टी-२० विश्वचषकात मिळवू शकतात स्थान

April 20, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Avesh-Khan-And-Umran-Malik

Photo Courtesy: Twitter/IPL


इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५वा हंगाम सध्या खेळला जात आहे. आयपीएल २०२२मधील जवळपास अर्धे सामने खेळले गेले आहे आणि अनेक युवा खेळाडूंनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. चालू हंगामात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांवर नजर टाकली, तर आगामी टी-२० विश्वचषकसाठी निवडला जाणारा भारतीय संघ नजरेसमोर उभार राहू शकतो.

यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. जाणकारांच्या मते आयपीएल २०२२मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या युवा खेळाडूंपैकी काहीजण भारताच्या टी-२० संघात स्थान बनवू शकतात. याच कारणास्तव युवा खेळाडू आयपीएल २०२२मध्ये चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. आज आपण या लेखातून अशा तीन भारतीय युवा वेगवान गोलंदाजांची माहिती घेणार आहोत, जे आगामी टी-२० विश्वचषकात (ICC T20 World Cup 2022) भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसू शकतात.

आयपीएल २०२२मध्ये भारतीय संघाला मिळाले हे ३ युवा वेगवान गोलंदाज

आवेश खान (Avesh Khan)
आयपीएलचा नवीन संघ लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज आवेश खान या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२१मधील उत्कृष्ट प्रदर्शनानंतर मेगा लिलावात लखनऊने १० कोटी रुपयांमध्ये आवेश खानला खरेदी केले. मागच्या हंगामात त्याने १६ सामन्यांमध्ये २४ विकेट्स घेतल्या होत्या आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील बनला होता.  आयपीएल २०२२ मधील त्याचे प्रदर्शन देखील असेच आहे.

चालू हंगामातील त्याच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर आतापर्यंत ८.२९च्या इकॉनॉमी रेटने आणि २०.०९च्या इकॉनॉमीने ११ विकेट्स घेतल्या आहे. सध्या तो पर्पल कॅपच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या या दमदार प्रदर्शनानंतर आगामी टी-२० विश्वचषकात त्याला संधी मिळणे जवळपास निश्चित झाले आहे.

उमरान मलिक (Umran Malik)
सनरायझर्स हैदरबादच्या उमरान मलिकने आयपीएल २०२२मध्ये त्याच्या वेगवान चेंडूंमुळे फलंदाजांपुढे चांगलेच आव्हान उभे केले आहे. प्रत्येकजण त्याची गती पाहून हैराण आहे. सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मागच्या वर्षाच्या चांगल्या प्रदर्शनानंतर हैदराबादने त्याला रिटेन केले होते. चालू हंगामात त्याने जवळपास प्रत्येक सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा मान पटकावला आहे. अशात टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याला संधी मिळू शकते.

आयपीएलच्या चालू हंगामातील पहिले निर्धाव षटक देखील त्यानेच टाकले आहे. हंगामात त्याने आतापर्यंत २२.३३ ची सरासरी आणि ९.१३च्या इकॉनॉमीने ९ विकेट्स घेतल्या आहेत. अशात भविष्यात त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण जवळपास निश्चित आहे.

प्रसिद्ध कृष्णा (Prasiddh Krishna)
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने त्याच्या विस्फोटक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. चालू हंगामात देखील त्याने विरोधी संघाच्या फलंदाजांचा घाम काढला आहे. मागच्या वर्षी त्याने केकेआरसाठी खेळलेल्या १० सामन्यांमध्ये २९.२५च्या सरासरीने आणि ९.११च्या इकोनॉमीने १२ विकेट्स घेतल्या होत्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

केकेआरमध्ये बदली खेळाडूच्या रूपात सहभागी झालेल्या प्रसिद्ध कृष्णाने २०१८पासून २०२१पर्यंत ३४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३८.४०च्या सरासरीने ३० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ३० धावा खर्च करून ४ विकेट्सचे राहिले आहे. चालू हंगामात त्याने आतापर्यंत ५ विकेट्स घेतल्या आहेत. तो नवीन चेंडूसोबत विकेट्स तर घेऊ शकतोच, पण अंतिम षटकांमध्येही संघाला विजय देखील मिळवून देऊ शकतो. याच कारणास्तव तो आगामी टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा भाग बनू शकतो.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘विराटने आता विश्रांती घ्यावी’, केवळ रवी शास्त्रीच नाही, तर ‘या’ दिग्गजाचाही सल्ला

विकेट गमावताच स्टॉयनिसची शिवीगाळ स्टंपमाईकमध्ये कैद, पाहा हेजलवुडच्या षटकात काय घडले

IPL2022| दिल्ली वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!


ADVERTISEMENT
Next Post
Josh-Hazlewood

आरसीबीसाठी 'छुपा रुस्तम' ठरतोय 'हा' वेगवान गोलंदाज, जबरदस्त प्रदर्शन करत गाजवतोय आयपीएल

Suryakumar-Yadav

'माझं तोंड बघून तुला कळत नाही का?', वाचा रोहितच्या 'त्या' प्रश्नावर असं का म्हणालेला सूर्यकुमार

Rishabh-Pant

'रिषभ पंतने फॉर्ममध्ये येणे खूप गरजेचे, नाहीतर...', भारताच्या माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.