---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय ‘या’ 10 खेळाडूंना संघातून सोडलं!

On: शनिवार, ऑगस्ट 3, 2024 7:12 PM
Phil Salt Rilee Rossouw
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) फ्रँचायझी टीम प्रिटोरिया कॅपिटल्सनं दक्षिण आफ्रिका (SA20) लीगच्या तिसऱ्या हंगामापूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. प्रिटोरिया कॅपिटल्सनं दक्षिण आफ्रिका (SA20) लीग 2025च्या आधी फिल साल्ट, आदिल रशीद यांच्यासह 10 खेळाडूंना सोडले आहे. मात्र, संघानं पुन्हा एकदा नॉर्टजे आणि विल जॅकवर विश्वास व्यक्त करत त्यांना तिसऱ्या हंगामासाठी संघात कायम ठेवलं आहे.

प्रिटोरिया कॅपिटल्सनं सोडलेले खेळाडू
फिल साल्ट, आदिल रशीद, कॉलिन इंग्राम, कॉलिन अकरमन, थ्युनिस डी ब्रुयन, कार्बिन बॉश, हार्डस विजलॉन, शेन डॅडवेल, मॅथ्यू बोस्ट, जॅक स्ट्रीमन दिल्ली कॅपिटल्सनं (SA20) तिसऱ्या हेगामासाठी या खेळाडूंवर विश्वास दाखवला नाही. प्रिटोरिया कॅपिटल्स संघानं (SA T20) 2024च्या हंगामात निराशाजनक कामगिरी केली होती त्यांनी 10 पैकी केवळ 3 सामने जिंकले होते. तर 7 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2024च्या हंगामात प्रिटोरिया संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला होता.

(SA20) लीगचा तिसरा हंगाम 9 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 8 फेब्रुवारीला फायनल सामना खेळवला जाणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेचे 2 हंगाम खेळले गेले आहेत, दोन्ही वेळा सनरायझर्स इस्टर्न कॅपनं विजेतेपद पटकावलें आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

कर्णधार रोहित दुसऱ्या वनडेत विजयासाठी मोठं पाऊल उचलणार, हुकुमी एक्का संघात पतरणार?
“आम्ही अनेकदा भेटत नाही पण…” कोहलीबद्दल भारताच्या माजी कर्णधारानं केला मोठा खुलासा
टीम इंडियावर ‘गंभीर इफेक्ट’; गोलंदाजी प्रशिक्षकाने स्पष्टच सांगितलं, “सलामीवीरांना भविष्यात….”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---