---Advertisement---

कर्णधार रोहित दुसऱ्या वनडेत विजयासाठी मोठं पाऊल उचलणार, हुकुमी एक्का संघात पतरणार?

On: शनिवार, ऑगस्ट 3, 2024 6:55 PM
---Advertisement---

IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाला अखेरच्या 14 चेंडूत एकही धाव करता आली नाही. परिणामी, हा सामना बरोबरीत सुटला. कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यातील खेळपट्टीबाबत बरीच चर्चा सुरू आहे. ही खेळपट्टी संथ होती आणि त्याचा फायदा फिरकीपटूंना मिळाला. यजमान संघाच्या फिरकीपटूंनी संथ खेळपट्टीवर पाहुण्यांविरुद्ध वर्चस्व गाजवले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामनाही याच मैदानावर खेळवला जाणार आहे. रविवारी (4 ऑगस्ट) खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय संघाला फिरकीपटू आणि संथ खेळपट्टीचा सामना करण्यासाठी मार्ग शोधावा लागणार आहे.

भारतीय संघाने खेळलेल्या पहिल्या वनडे सामन्यात 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक वेळ 3 गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा केल्यानंतर भारतीय संघाची स्थिती चांगली दिसत होती. मात्र, यानंतर श्रीलंकेचे फिरकीपटू वरचढ ठरले. भारतीय संघ 230 धावांवर बाद झाल्याने सामना बरोबरीत राहिला. रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. परंतु, त्यानंतर श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी रणनीती अमलात आणली.

या सामन्यात भारताच्या फिरकीपटूंनी देखील चांगली कामगिरी केली होती.‌ कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर व अक्षर पटेल या तीन प्रमुख फिरकी गोलंदाजांनी तसेच शुबमन गिल याने देखील एक षटक टाकले. असे असले तरी दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल केला जाणार का? हे पाहावे लागेल.

दुसऱ्या सामन्यात बदल करायचा झाल्यास भारतीय संघात यष्टीरक्षक रिषभ पंत किंवा रियान पराग यांना स्थान मिळू शकते. नुकत्याच संपलेल्या टी20 मालिकेत या दोघांची देखील कामगिरी उत्कृष्ट झाली होती. असे झाल्यास मधल्या फळीत श्रेयस अय्यर किंवा केएल राहुल यांना बाकावर बसावे लागू शकते.

दुसऱ्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय प्लेईंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, अक्षर पटेल, शिवम दुबे, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.

हेही वाचा – 

टीम इंडियावर ‘गंभीर इफेक्ट’; गोलंदाजी प्रशिक्षकाने स्पष्टच सांगितलं, “सलामीवीरांना भविष्यात….”

क्रिकेटचा थरार होणार डबल! भारतातील या शहरात बांधण्यात येणार आणखी एक आंतरराष्ट्रीय स्टेडियम
भारतानं दोनच वनडे विश्वचषक जिंकले, मग जर्सीवर तीन स्टार्स कसे?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---