---Advertisement---

विराट, धोनीच्या बॅट-जर्सीचा होणार लिलाव, केएल राहुल-अथिया शेट्टीनं उचललं मोठं पाऊल; होतंय कौतुक

On: शनिवार, ऑगस्ट 3, 2024 7:36 PM
Dhoni, KL Rahul Athiya
---Advertisement---

क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) सध्या भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेदरम्यान, केएल राहुलने त्याची पत्नी आणि अभिनेत्री आथिया शेट्टीसह (Athiya Shetty) एका चॅरिटी उपक्रमाची घोषणा केली आहे. विप्ला फाउंडेशनसाठी निधी उभारण्यासाठी या जोडप्याने क्रिकेटमधील काही मोठ्या नावांसोबत हातमिळवणी केली आहे. या चॅरिटी उपक्रमाला ‘क्रिकेट फॉर अ कॉज’ असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत राहुल आणि आथियाने एका खास क्रिकेट लिलावाचे आयोजन केले आहे. यामध्ये अनेक मोठे खेळाडू आपल्या आवडत्या गोष्टी दान करतील आणि फाउंडेशनसाठी पैसे उभारण्याचे काम करतील.

या मोहिमेसाठी केएल राहुल आणि आथिया शेट्टीसह राहुल द्रविड, एमएस धोनी, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा आणि लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळणारे विदेशी क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोयनिस आणि निकोलस पूरन तसेच इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर योगदान देणार आहे. हा लिलाव 23 ऑगस्ट रोजी होईल.

या उपक्रमाविषयी बोलताना आथिया म्हणाली, “विप्ला फाउंडेशन हा माझ्या बालपणाचा महत्त्वाचा भाग आहे. मी शाळेत शिकल्यानंतर बरेच दिवस मुलांसोबत घालवले आहेत. या लिलावाद्वारे, मला माझ्या आजीचा वारसा पुढे चालू ठेवण्याची आशा आहे. तीने श्रवणशक्ती कमजोर आणि बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विप्ला फाउंडेशन सुरू केलेले.” आथियाचे वडील अभिनेता सुनील शेट्टी हे देखील अशाप्रकारे अनेक उपक्रम राबवत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

राहुल याने देखील आपण या उपक्रमासाठी खूप उत्साही असल्याचे म्हटले. तसेच, क्रिकेट जगतातून या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्वच खेळाडूंचे त्याने विशेष आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित आणि गंभीरचा प्रयोग फसला, दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला सुधारावी लागेल ही चूक

आर अश्विनचा फलंदाजीत कहर! सलामीला येऊन अवघ्या 30 चेंडूत फिरवला सामना

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी पाहा भारतीय संघाची संभावित प्लेइंग 11

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---