राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएल २०२२ हंगामात चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. शुक्रवारी (२२ एप्रिल) बटलरने चालू आयपीएल हंगामातील स्वतःचे तिसरे शतक ठोकले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना बटलरने तब्बल ९ षटकारांच्या मदतीने ११६ धावा ठोकल्या. या जबरदस्त खेळीनंतर बटलरने अनेक विक्रम नावावर केले आणि राजस्थानला विजय देखील मिळवून दिला.
जोस बटलर (Jos Buttler) आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत तब्बल ३२ षटकार मारून बसला आहे. तो आता राजस्थान रॉयल्ससाठी एका आयपीएल हंगामात सर्वात जास्त षटकार मारणारा फलंदाज देखील बनला आहे. चालू हंगामातील अजून लीग स्टेजचे जवळपास अर्धे सामने शिल्लक असताना बटलरने एवढे षटकार ठोकले आहेत आणि हा आकडा अजून पुढे नक्कीच वाढणार आहे.
J.O.S B.U.T.T.L.E.R ???????? #TATAIPL #DCvRR pic.twitter.com/5UwbLn6qvx
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
राजस्तान रॉयल्स (Rajasthan Royals) संघासाठी एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांचा विचार केला, तर बटलर आता या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसन आहे, ज्याने २०२० मध्ये संघासाठी २६ षटकार ठोकले होते. तिसऱ्या क्रमांकावर युसूफ पठाण आहे, ज्याने आयपीएल २००८ मध्ये संघासाठी २५ षटकार मारले होते. चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा युसूफ पठाणचे नाव आहे. आयपीएल २०१० मध्ये पठाणने २४ षटकार ठोकले होते. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर शेन वॉटसन आहे. वॉटसनने आयपीएल २०१३मध्ये २२ षटकार ठोकले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, उभय संघातील या सामन्याच विचार केला, तर राजस्थआनचे सलामीवीर जोस बटलर (६५ चेंडूत ११६ धावा) आणि देवदत्त पडिक्कल (३५ चेंडूत ५४ धावा) यांनी १५५ धावांची भागीदारी केली आणि राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. तसेच, कर्णधार संजू सॅमसनने अवघ्या १९ चेंडूत ४६ धावा ठोकल्या आणि संघाची धावसंख्या २२२ पर्यंत घेऊन गेला.
प्रत्युत्तरात जेव्हा दिल्लीचा संघ मैदानात आला, तेव्हा त्यांचा सलामीवीर डेविड वॉर्नरने २८ , तर पृथ्वी शॉने ३७ धावा करून विकेट गमावल्या. मध्यक्रमात रिषभ पंत ४४ धावा करू शकला. परंतु संघाला विजय मिळवून देणारी खेळी एकही फलंदाज करू शकला नाही. परिणामी दिल्लीने १५ धावांनी पराभव पत्करला.
एका आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
३२ षटकार- जोस बटलर (२०२२)*
२६ षटकार – संजू सॅमसन (२०२०)
२५ षटकार – युसूफ पठाण (२००८)
२४ षटकार – युसूफ पठाण (२०१०)
२२ षटकार – शेन वॉटसन (२०१३)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! पंतपासून ते शार्दुलपर्यंत आख्खी दिल्ली टीम एकमेकांकडे पाहात होती रागाने
फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! राजस्थानने १५ धावांनी उडवला दिल्लीचा धुव्वा