Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काय सांगता! पंतपासून ते शार्दुलपर्यंत आख्खी दिल्ली टीम एकमेकांकडे पाहात होती रागाने

काय सांगता! पंतपासून ते शार्दुलपर्यंत आख्खी दिल्ली टीम एकमेकांकडे पाहात होती रागाने

April 22, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Rishabh-Pant

Photo Courtesy: iplt20.com


राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात शुक्रवारी (दि. २२ एप्रिल) आयपीएलचा ३४वा सामना पार पडला. मुंबईच्या जगप्रसिद्ध वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी वादळी खेळी करत दिल्लीविरुद्ध २००हून अधिक धावांचा डोंगर उभा केला. यादरम्यान दिल्लीच्या गोलंदाजांकडून अनेक चुका झाल्या. त्यामुळे दिल्लीच्या गोटात एकूणच वातावरण तापल्याचे दिसले. संघातील खेळाडू एकमेकांवर चिडलेले दिसले. या सर्व गोष्टींबद्दल सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलीये. तसेच, यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत आहेत.

झाले असे की, दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीला राजस्थान रॉयल्सचा संघ उतरला. यावेळी राजस्थानचे सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनी दिल्लीच्या गोलंदाजांविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. दोघांनीही फक्त ९१ चेंडूत १५५ धावांची दीडशतकी भागीदारी रचली. यामध्ये बटलरच्या शतकाचाही समावेश होता. शेवटी कर्णधार संजू सॅमसननेही १९ चेंडूत ४६ चेंडूंची आतिषी खेळी खेळत राजस्थानची धावसंख्या २२२ पर्यंत पोहोचवली.

यावेळी दिल्लीचे गोलंदाज पूर्णत: अयशस्वी ठरले. त्यानंतर कर्णधार रिषभ पंत गोलंदाजांवर चिडलेला दिसला. यावेळी शेवटच्या षटकादरम्यान शार्दुल ठाकूर चौकार न अडवल्यामुळे कुलदीप यादववर चिडताना दिसला.

RR v DC#RRvDC #TATAIPL2022 #shardul #Shardulthakur #Rishabh pic.twitter.com/xPIr3QEpJ7

— MonaLisa Pathak (@monalisa_1418) April 22, 2022

When sanju samson hit a six off the last ball of shardul thakur in the 20th over, then Rishabh Pant's reaction …… leg stump par full toss ball kyon dala. #RRvsDC #IPL2022 #jossbuttler pic.twitter.com/1j7KJoXCUB

— धीरज शर्मा 🇮🇳🇮🇳🇮🇳 (@dheerajs107) April 22, 2022

Rishabh pant be like kya kru ye bowlers ka me😂 #chahal #DCvRR #DelhiCapitals #RishabhPant #IPL2022 #IPLFantasyLeague pic.twitter.com/hmnQc6DN43

— Harsh (@harshhhhh17) April 22, 2022

तत्पूर्वी मधल्या षटकातही असेच काहीसे  दिसले. संघातील खेळाडू अक्षर पटेल, मुस्तफिजूर रहमान, खलील अहमद हे खेळाडू सामन्यादरम्यान झालेल्या चुकांवेळी एकमेकांकडे रागाने पाहत होती. विशेष म्हणजे, रिषभ पंतच्या या सामन्यातील नेतृत्वामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

येथे पाहा ट्वीट-

Worst captaincy by Rishabh pant when all the bowlers were hammered Shardul thakur has given 9 runs in 2 overs and can you imagine he hasn't completed his quota

— PARVEEN KUMAR (@PARVEEN17161475) April 22, 2022

Rishabh Pant & Delhi Capitals right now!#RRvsDC #IPL2022 #DCvsRR pic.twitter.com/IfWbq5vA5n

— Vikas Rai (@VikasRa69144233) April 22, 2022

Axar only 2 overs and thakur 3 when he's bowled at 5 rpo. Rishabh Pant at the moment is not captaincy material. And his batting has taken a massive hit.

— Sub Zero (@RyujinJakka24) April 22, 2022

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स फलंदाजीला आल्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नरने चांगली फटकेबाजी केली. मात्र, पॉवरप्लेमध्येच त्यांना २ महत्त्वाचे विकेट्स गमवावे लागले. यावेळी वॉर्नर २८ आणि सर्फराज खान फक्त १ धावेवर तंबूत परतला. पुढे नियमित अंतराने संघाने महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. कर्णधार रिषभ पंतही ४४ धावा करून बाद झाला. दिल्लीला गुणतालिकेतील आपले स्थान मजबूत करायचे असेल, तर या सामन्यात विजय मिळवावा लागेल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

अफलातून! सर्वाधिक आयपीएल शतके करणाऱ्यांमध्ये जोस बटलरने गाठला ‘हा’ क्रमांक, डिविलियर्सलाही पछाडलं

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात पाय टाकताच कर्णधार सॅमसनचा भन्नाट विक्रम; बनला राजस्थानचा ‘रॉयल’ खेळाडू

गुजरातच्या खेळाडूंना झालं तरी काय? सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत सत्य आले समोर

 


ADVERTISEMENT
Next Post
Jos-Buttler-And-Devdutt-Padikkal-IPL

बटलर-पडिक्कल जोडीने रचला इतिहास, भावांनी राजस्थान संघासाठी साकारली आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी

Jos-Buttler-RR

संपूर्ण हंगाम खेळून जे भल्याभल्यांना जमत नाही, ते बटलरने अवघ्या ७ सामन्यात केले; पाहा 'बॉस'चा भीमपराक्रम!

DC-vs-RR

DC vs RR। शेवटच्या षटकात भलताच राडा, कर्णधार पंतने चालू सामन्यात केलेला फलंदाजांना मैदान सोडण्याचा इशारा

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.