इंग्लंड संघाचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर आयपीएल २०२२मध्ये शानदार प्रदर्शन करताना दिसत आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना तो आपल्या वादळी फलंदाजीने सर्वांची मने जिंकत आहे. शुक्रवारी (दि. २२ एप्रिल) राजस्थानने आयपीएलच्या ३४व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना केला. यादरम्यान राजस्थानकडून खेळताना जोस बटलरने खास कामगिरी केली. विशेष म्हणजे, त्याने ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेललाही मागे टाकले.
या सामन्यात दिल्लीने (Delhi Capitals) नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी राजस्थानच्या (Rajasthan Royals) फलंदाजांनी दिल्लीचा हा निर्णय प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या गोलंदाजांना चोप देत निर्धारित २० षटकात २ विकेट्स गमावत २२२ धावांचा डोंगर उभारला. विशेष म्हणजे, यातील ११६ धावा या जोस बटलरच्या (Jos Buttler) बॅटमधून निघाल्या होत्या. सलामीवीर बटलरने फलंदाजी करताना ६५ चेंडूत ११६ धावा चोपल्या. यामध्ये ९ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, हे बटलरचे हंगामातील तिसरे शतक होते. यासह त्याने एक खास कारनामा केला आहे.
J.O.S B.U.T.T.L.E.R ???????? #TATAIPL #DCvRR pic.twitter.com/5UwbLn6qvx
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
बटलर आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत अव्वलस्थानी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. विराटने २०१६ सालच्या आयपीएल हंगामात एकूण ४ शतके झळकावली होती. या यादीत २ शतकांसह तिसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या ख्रिस गेल, हाशिम आमला, शेन वॉटसन आणि शिखर धवन हे खेळाडू आहेत. गेलने आयपीएल २०११ हंगामात, आमलाने आयपीएल २०१७ हंगामात, वॉटसनने आयपीएल २०१८ हंगामात आणि धवनने आयपीएल २०२०-२१ हंगामात ही खास कामगिरी केली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक शतके साजरे करणारे खेळाडू
४ शतके- विराट कोहली, २०१६
३ शतके- जोस बटलर, २०२२*
२ शतके- ख्रिस गेल, २०११
२ शतके- हाशिम आमला, २०१७
२ शतके- शेन वॉटसन, २०१८
२ शतके- शिखर धवन, २०२०/२१
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वप्नातलं घर! अथिया- राहुलने मुंबईत घेतले आलिशान अपार्टमेंट; लग्नानंतर याच घरात राहण्याची तयारी
मला आता पळून धावा काढाव्या लागत नाहीत; पृथ्वी शॉच्या ‘धडाकेबाज सलामी शो’वर फिदा झाला वॉर्नर