---Advertisement---

IPL 2024 : आयपीएलपूर्वी हार्दिक पांड्याने रोहितचा व्हिडिओ केला शेअर, अन् म्हणाला, ‘कोणीही…

Hardik-Pandya-And-Rohit-Sharma
---Advertisement---

आयपीएलच्या 17 व्या हंगामाला आता फक्त मोजून काहीच दिवस राहिले आहेत. तर आयपीएल 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तसेच पहिलाच सामना हा हायव्होल्टेज असा असणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना पार पडणार आहे. यामध्ये महेंद्रसिंह धोनी विरुद्ध विराट कोहली असा हा सामना असणार आहे. या हंगामाआधी एक एक करुन खेळाडू टीमसोबत जोडले जात आहे. 

याबरोबरच पण आता स्पर्धा जवळ आली आहे आणि त्याआधी वेगवेगळे प्रोमो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. अशातच शुक्रवारी एक नवीन प्रोमो आला ज्यामध्ये सर्व टीमचे मोठे खेळाडू किंवा कर्णधार दुसऱ्या टीमच्या लोकांना चिडवत असून त्याचा व्हिडिओ हार्दिक पांड्याने ट्टिटरवरती शेअर केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा देखील पहायला मिळत आहे. पण हार्दिकने त्याच्या अंकाऊट वरून रोहितचा व्हिडिओ का शेअर केला असेल असा अंदाज आता सगळीकडे लावला जात आहे. तर या व्हिडिओमध्ये रोहित दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतसोबत बोलत आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्याही बोलताना दिसत आहेत. तर हार्दिक पांड्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘भाईने सांगितले की या स्पर्धेत कोणीही कोणाचे नाही, पण आम्हीही तयार आहोत.’

दरम्यान, याच व्हिडीओमध्ये रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यात बाचाबाची दिसत आहे ज्यामध्ये पंत रोहितला बसमध्ये चढू देत नाही. तसेच इशान किशन आणि हार्दिक पांड्या अय्यरला डिवचत आहेत. तसेच  माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ आणि कृष्णमाचारी श्रीकांत हेही आपापल्या संघाला पाठिंबा देताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---