---Advertisement---

पाच असे दिग्गज खेळाडू जे कधीच IPL मध्ये खेळू शकले नाहीत, जाणून घ्या

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी 20 लीग आहे. या लीगमध्ये खेळून अनेक खेळाडूंचं नशीब रातोरात पालटलं. त्यामुळे या लीगचा भाग बनणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं.

मात्र, काही असे खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. चला तर मग आज आम्ही तुम्हाला अशा पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे या स्पर्धेचा भाग कधीच होऊ शकले नाहीत.

1. जेम्स अँडरसन – इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन इंडियन प्रीमियर लीगचा भाग कधीच झाला नाही. अँडरसननं इंग्लंडकडून 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु तो कधीही आयपीएलमध्ये खेळला नाही.

2. स्टुअर्ट ब्रॉड – जेम्स अँडरसनप्रमाणेच इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड देखील अशा खेळाडूंमध्ये सामील आहे ज्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, ब्रॉडनं स्वतः इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्यात फारसा रस दाखवला नाही.

3. ब्रायन लारा – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर करणारा वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्याला या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. लारा या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून सामील झाला, परंतु खेळाडू म्हणून तो या लीगमध्ये कधीही खेळू शकला नाही.

4. मुशफिकुर रहीम – बांगलादेशचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम हा देखील आयपीएलचा भाग राहिलेला नाही. मुशफिकुरनं इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात त्याचं नाव पाठवलं होतं. मात्र त्याला खरेदी करण्यात कोणत्याही संघानं रस दाखवला नाही.

5. तमीम इक्बाल – बांगलादेशचा स्फोटक सलामीवीर फलंदाज तमीम इक्बाल हा देखील इंडियन प्रीमियर लीगचा कधीच भाग झालेला नाही. तमिमला टी-20 फॉरमॅट चांगला खेळता येतो. या फॉरमॅटमध्ये त्यानं 78 मॅचमध्ये 1758 धावा केल्या आहेत. झटपट क्रिकेटमध्ये तमीमच्या नावावर शतकही आहे. मात्र असं असूनही तो या लीगमध्ये कधी खेळू शकलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्मामुळे वाचलं हार्दिक पांड्याचं करिअर? माजी क्रिकेटपटूनं केला मोठा खुलासा

दिल्ली कॅपिटल्समध्ये लुंगी एनगिडीच्या जागी ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची एन्ट्री, 29 चेंडूत ठोकलं होतं शतक!

IPL 2024 पूर्वी ऋषभ पंत नेट्समध्ये करतोय हेलिकॉप्टर शॉटचा सराव, पाहा Viral Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---