शुक्रवारी (२२ एप्रिल) आयपीएलच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आमना-सामना झाला. हा सामना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसाठी खूपच खास ठरला. संजू सॅमसनने या सामन्यासाठी मैदानात पाय टाकताच राजस्थान रॉयल्ससाठी एका खास विक्रमाची नोंद केली.
संजू सॅमसन (Sanju Samson) मागच्या अनेक हंगामांपासून राजस्थान रॉयल्ससाठी खेळत आला आहे. अशात आता शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने या फ्रँचायझीसोबत त्याचा १००वा सामना खेळला. राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीला त्यांच्यासोबत १०० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करणारा दुसरा खेळाडू मिळाला आहे. यापूर्वी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा एकमेव खेळाडू होता, ज्याने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचे १०० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. आता या यादीत संजू सॅमसन नव्याने सहभागी झाला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संजू सॅमसनने कर्णधाराच्या रूपात फ्रँचायझीसाठी आतापर्यंत अप्रतिम प्रदर्शन केले आहे. मागच्या हंगामात सॅमसनने एका चांगल्या कर्णधाराच्या रूपात स्वतःला सिद्ध केले होते, पण संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचवू शकला नाही. परंतु या हंगामात चाहत्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. चालू हंगामातील पहिल्या ६ सामन्यांपैकी ४ सामने राजस्थानने जिंकले आहेत. गुणतालिकेत संघ ८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, शुक्रवारी राजस्थान आणि दिल्ली (RR vs DC) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचा विचार केला, तर राजस्थानने नाणेफेक गमावली आणि त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. राजस्थानसाठी सलामीवीर जोस बटलर अप्रतिम प्रदर्शन करत आला आहे. दिल्लीविरुद्ध देखील त्याने अप्रतिम खेळ दाखवला आणि वैयक्तिक शतक पूर्ण केले. तसेच राजस्थानचा दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने ५४ धावा करून विकेट गमावली. खलील अहमदने पडिक्कलला तंबूत धाडले.
बटलर आणि पडिक्कल या दोघांनुळे राजस्थानला एक उत्कृष्ट सुरुवात मिळाली. बटरने त्याचे शतक अवघ्या ५७ चेंडूत पूर्ण केले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ८ चौकार आणि ८ षटकार निघाले. सलामीवीरांना पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी पार पाडली. राजस्थानने फक्त २ विकेट्स गमावत २२२ धावा चोपल्या आणि दिल्लीला २२३ धावांचे आव्हान दिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वप्नातलं घर! अथिया- राहुलने मुंबईत घेतले आलिशान अपार्टमेंट; लग्नानंतर याच घरात राहण्याची तयारी
मला आता पळून धावा काढाव्या लागत नाहीत; पृथ्वी शॉच्या ‘धडाकेबाज सलामी शो’वर फिदा झाला वॉर्नर