Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बटलर-पडिक्कल जोडीने रचला इतिहास, भावांनी राजस्थान संघासाठी साकारली आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी

बटलर-पडिक्कल जोडीने रचला इतिहास, भावांनी राजस्थान संघासाठी साकारली आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी

April 23, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Jos-Buttler-And-Devdutt-Padikkal-IPL

Photo Courtesy: iplt20.com


इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने शुक्रवारी (२२ एप्रिल) आयपीएल २०२२ मधील तिसरे शतके ठोकले. राजस्थान रॉयल्सच्या डावाची सुरुवात करायला आलेल्या बटलरने ११६ धावा ठोकल्या आणि संघाला एक चांगली सुरुवात दिली. बटलरला देवदत्त पडिक्कलने चांगली साथ दिली आणि वैयक्तिक अर्धशतक देखील पूर्ण केले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी पार पाडली आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यास मदत केली.

राजस्थानचे सलामीवीर फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) आणि देवदत्त पडिक्कल (Devdatt Padikkal) यांनी सामन्यात अनुक्रमे ११६ आणि ५४ धावांची महत्वाची खेळी केली. या दोघांच्या १५५ धावांच्या भागीदारीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानला २२२ धावांचा डोंगर उभा करता आला. या दोघांनी केलेली ही भागीदारी राजस्थान रॉयल्सच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी देखील ठरली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राजस्थान रॉयल्ससाठी दुसरी सर्वात मोठी भागीदारी बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी केली होती. आयपीएल २०२२ हंगामात या दोघांनी नाबाद १५२ धावांची भागीदारी पार पाडली होती. त्यानंतर तिसरी सर्वात मोठी भागीदारी देखील बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन याच जोडीनेच केली होती. आयपीएल २०२१ मध्ये सॅमसन आणि स्टोक्सने मिळून १५० धावांचे योगदान दिले होते.

37 + 63 getting a 100-run stand. 😍💗#RoyalsFamily | #DCvRR pic.twitter.com/jq6oPYjV5B

— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 22, 2022

दरम्यान, राजस्थान आणि दिल्ली (RR vs DC) यांच्यात मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २ विकेट्स गमावल्या आणि २२२ धावा केल्या. यामध्ये सालामीवीरांव्यतिरिक्त कर्णधार संजू सॅमसनने देखील १९ चेंडूत ४६ धावा ठोकल्या.

राजस्थान रॉयल्ससाठी केल्या गेलेल्या सर्वात मोठ्या भागीदाऱ्या
१५५ धावा- जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल (२०२२)*

१५२ धावा- बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन (२०२०)
१५० धावा- बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन (२०२१)

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

अफलातून! सर्वाधिक आयपीएल शतके करणाऱ्यांमध्ये जोस बटलरने गाठला ‘हा’ क्रमांक, डिविलियर्सलाही पछाडलं

जे ख्रिस गेललाही नाही जमलं, ते जोस बटलरनं करून दाखवलं; पाहा राजस्थानच्या पठ्ठ्याचा खास विक्रम

गुजरातच्या खेळाडूंना झालं तरी काय? सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत सत्य आले समोर


ADVERTISEMENT
Next Post
Jos-Buttler-RR

संपूर्ण हंगाम खेळून जे भल्याभल्यांना जमत नाही, ते बटलरने अवघ्या ७ सामन्यात केले; पाहा 'बॉस'चा भीमपराक्रम!

DC-vs-RR

DC vs RR। शेवटच्या षटकात भलताच राडा, कर्णधार पंतने चालू सामन्यात केलेला फलंदाजांना मैदान सोडण्याचा इशारा

Tennis

डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज स्पर्धेत देशभरांतून १०० खेळाडू सहभागी

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.