---Advertisement---

कोल्हापूरकर स्वप्नील कुसाळेसाठी सतेज पाटलांनी पेटारा उघडला, जाहीर केलं मोठं बक्षीस

Satej Patil, Swapnil Kusale
---Advertisement---

Swapnil Kusale : पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympic 2024) सहाव्या दिवशी (1 ऑगस्ट) भारतासाठी कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याने पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. या विजयासह त्याने भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरे पदक मिळवून दिले. त्यानंतर आता त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी देखील त्याचे अभिनंदन करत बक्षिस रक्कम जाहीर केली आहे.

सतेज पाटील आणि त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी मिळून स्वप्नील कुसाळेचे कौतुक करत त्याला 5 लाख रूपयांचा इनाम जाहीर केला आहे. यासंबधीची पोस्ट सतेज पाटलांनी आपल्या सोशल मिडीया एक्सवर शेअर केली आहे. यावेळी त्यांनी लिहिले ‘ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरकर चमकला! स्वप्नील सुरेश कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात कांस्य पदक जिंकून आपल्या शहराचा आणि देशाचा अभिमान वाढवला आहे. कोल्हापूरच्या क्रीडा समुदायासाठी आणि संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्याचबरोबर स्वप्नीलला 5 लाखांचे इनाम जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे”, असेही त्यांनी म्हटले आहे.

स्वप्निलने पदक जिंकलेल्या स्पर्धेत नेमबाजांना तीन पोझिशनमध्ये (बसून, झोपून आणि आणि उभं राहून) निशाणा लावावा लागतो. स्वप्नीलने 50 मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत एकूण 451.4 इतका स्कोअर केला. चीनचा लिऊ अव्वल स्थानावर राहिला. त्याचा स्कोर 463.6 होता. तर युक्रेनच्या सेरहीने रौप्य पदक जिंकले.

स्वप्नीलने 2012 मध्ये त्याच्या शूटिंग कारकीर्दीला सुरुवात केली. तो कोल्हापुरच्या कांबळवाडी गावचा असून, त्याचे वडील आणि भाऊ शिक्षक आहेत. तसेच त्याची आई कांबळवाडी गावच्या सरपंच आहेत. स्वप्नील 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 मीटर रायफल 4 पोझिशन्स स्पर्धेत सुवर्णपदक विजेता होता.

महत्त्वाच्या बातम्या-

एकच चर्चा- ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या स्वप्निलने कोणती अंगठी घातली होती हातात?
मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेचं जगभर काैतुक, पंतप्रधान मोदींची कांस्य पदक विजेत्यासाठी खास पोस्ट
मराठी पाऊल पडते पुढे; कोल्हापुरच्या पठ्ठ्याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गरुड झेप, कांस्य पदकावर कोरलं नाव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---