पॅरिस ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी (01 ऑगस्ट) भारतासाठी मोठी बातमी समोर येत आहे. कोल्हापूरचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या स्पर्धेत मराठमोळ्या स्वप्नील कुसळेने शानदार नेमबाजी कांस्यपदक जिंकले आहे. या विजयासह त्याने भारतासठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरा पदक मिळवून दिला.
या स्पर्धेत नेमबाजांना तीन पोझिशनमध्ये (बसून, झोपून आणि आणि उभं राहून) निशाणा लावावा लागतो. स्वप्नीलने 50 मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत एकूण 451.4 इतका स्कोअर केला. चीनचा लिऊ युकुन अव्वल स्थानावर राहिला. त्याचा स्कोर 463.6 होता. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने दुसरा क्रमांक पटकावला.
SWAPNIL KUSALE HAS WON BRONZE MEDAL pic.twitter.com/iYyqGBEkNV
— The Khel India (@TheKhelIndia) August 1, 2024
स्वप्नीलपूर्वी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचवेळी सरबजोतसह मनूने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.अशा प्रकारे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात तीन पदकं आली आहे.
स्वप्नीलने 2012 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय शूटिंग करिअरला सुरुवात केली. तो कोल्हापुरच्या कांबळवाडी गावातून आला आहे, त्याचे वडील आणि भाऊ दोघेही शिक्षक आहेत आणि त्याची आई कांबळवाडी गावची सरपंच आहे. तारुण्यात, त्याला दोन खेळांपैकी एक निवडावा लागला, परंतु त्याने नेमबाजी करण्याचा निर्णय घेतला. स्वप्नील 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 मीटर रायफल 4 पोझिशन्स स्पर्धेत सुवर्णपदक विजेता होता.