पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहाव्या दिवशी म्हणजेच आज (1 ऑगस्ट) भारताने तिसरे पदक जिंकले आहे. 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशनमध्ये मराठमोळ्या स्वप्निलने कांस्य पदक जिंकले आहे. कोल्हापूरच्या या पठ्ठ्याने आपल्या गावासह, महाराष्ट्रासह देशाचा नाव पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उंचावला आहे. या स्पर्धेदरम्यान स्वप्निलच्या बोटातील अंगठी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताने या खेळात तीन पदके जिंकली आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी भारताला 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये तिसरे पदक मिळाले. स्वप्नील कुसळे याने भारताला पहिल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून दिले. 451.4 गुण मिळवून त्याने भारतासाठी हे पदक जिंकले. भारताला 50 मीटर रायफल 3 पोझिशन या स्पर्धेत स्वप्निलने पहिल्यांदाज पदक मिळवून दिले आहे. या नेमबाजीच्या गेममध्ये नेमबाजास (झोपून ,बसून आणि उभा राहून) तीन पोझिशन मधून शूटींग करावे लागते. या स्पर्धेदरम्यान मात्र स्वप्निलच्या हतातील अंगठी प्रमुख अर्कषणाचे कारण बनली. त्याने ऑलिम्पिकच्या पाच वर्तुळांची अंगठी बोटात घातला होता.
Swapnil Kusale was wearing an ‘Olympic logo’ shaped ring in his hands.
– He’s now an Olympic Bronze Medalist. 🥉 pic.twitter.com/uefsiAIubX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 1, 2024
स्वप्नीलने 50 मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत एकूण 451.4 इतका स्कोअर केला. चीनचा लिऊ युकुन अव्वल स्थानावर राहिला. त्याचा स्कोर463.6 होता. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने दुसरा क्रमांक पटकावला.
पदक मिळवल्यानंतर स्वप्निलने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पदक जिंकल्यानंतर स्वप्निल म्हणाला, ‘खूप आनंद झाला आहे. अजूनही माझ्या हृदयाचे ठोके वाढलेले जाणवतायत. एलिमिनेशन राऊंडमध्ये मी फक्त माझ्या श्वासावर लक्ष केंदित केलं होतं. स्कोरचा विचार मी अजिबात विचार करत नव्हतो. जे इतके वर्ष करत होतो तेच यावेळीही फॅालो केलं. भारतासाठी मेडल जिंकल्याचा आनंद जास्त आहे’
हेही वाचा-
मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेचं जगभर काैतुक, पंतप्रधान मोदींची कांस्य पदक विजेत्यासाठी खास पोस्ट
मराठी पाऊल पडते पुढे; कोल्हापुरच्या पठ्ठ्याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गरुड झेप, कांस्य पदकावर कोरलं नाव
हेड कोच बनल्यानंतर गंभीर-कोहली पहिल्यांदाच एकत्र, वनडे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज