---Advertisement---

मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेचं जगभर काैतुक, पंतप्रधान मोदींची कांस्य पदक विजेत्यासाठी खास पोस्ट

On: गुरूवार, ऑगस्ट 1, 2024 3:31 PM
---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आली आहे. स्वप्निलने कोल्हापुर महाराष्ट्रासह भारताची मान पॅरिसमध्ये अभिमानाने उंचावली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरच्या स्वप्निल कुसाळे याने मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांच्यानंतर भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे.

स्वप्निलने भारताला पुरुषांच्या 50मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदकावर नाव कोरले आहे. त्याची रौप्य पदकाची संधी अवघ्या काही पॉइंट्सने हुकली. मात्र त्यानंतरही स्वप्निलने कांस्य पदक मिळवल्याने साऱ्या भारतातासह महाराष्ट्रात आनंदाची लाट पसरली आहे. स्वप्निल या प्रकारात पदक मिळवून देणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर त्याचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफार्म ‘X’ पोस्ट करत स्वप्निलचं अभिनंदन केलं आहे.

“स्वप्नील कुसळेची अप्रतिम कामगिरी! स्वप्निलचं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन. त्याची कामगिरी विशेष आहे. कारण त्याने कौशल्य दाखवले आहे. तसेच या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रत्येक भारतीय आनंदाने भरलेला आहे”, अशा शब्दात पंतप्रधानांनी स्वप्निलचं अभिनंदन केलं आहे.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने देखील मराठमोळ्या स्वप्नील कुसळेचं काैतुक केले आहे.

हेही वाचा-

मराठी पाऊल पडते पुढे; कोल्हापुरच्या पठ्ठ्याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गरुड झेप, कांस्य पदकावर कोरलं नाव
हेड कोच बनल्यानंतर गंभीर-कोहली पहिल्यांदाच एकत्र, वनडे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज
रिटेन्शन नियमांवर काव्या मारन संतप्त, बीसीसीआय आणि संघमालक बैठकीत उपस्थितीत केला मोठा प्रश्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---