Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डेविड वॉर्नरने हद्दच पार केली! आऊट झाल्यानंतर केली अशी कृती, Video पाहून घ्या समजून

डेविड वॉर्नरने हद्दच पार केली! आऊट झाल्यानंतर केली अशी कृती, Video पाहून घ्या समजून

April 23, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, यांच्यात शुक्रवारी (२२ एप्रिल) आयपीएल २०२२चा ३४ वा सामना झाला. राजस्थानने १५ धावांनी हा सामना जिंकला. मात्र या सामन्यापेक्षा जास्त सामन्यादरम्यान झालेल्या वादांची जास्त चर्चा झाली. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत ते फिरकीपटू कुलदीप यादवपर्यंत दिल्लीचा संपूर्ण संघ या सामन्यादरम्यान वेगळ्याच अंदाजात दिसला. यात दिल्लीचा सलामीवीर डेविड वॉर्नर याचाही समावेश होता. वॉर्नर या सामन्यादरम्यान जास्त योगदान देऊ शकला नाही. तो बाद झाल्यानंतर आपली विकेट न गेल्याप्रमाणे वागत होता.

त्याचे झाले असे की, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या (Jos Buttler) शतकी खेळीच्या जोरावर २२२ धावा फलकावर लावल्या. राजस्थानच्या २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून (Delhi Capitals) वॉर्नर (David Warner) आणि पृथ्वी शॉ सलामीला फलंदाजीसाठी आले होते. दिल्लीच्या डावातील पाचव्या षटकादरम्यान वॉर्नरने प्रसिद्ध कृष्णाला सलग २ चौकार ठोकले. मात्र त्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर वॉर्नर मोठा फटका खेळण्याच्या नादात यष्टीमागे उभा असलेल्या संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन बसला.

वॉर्नरने या चेंडूवर यष्टींपुढून दूर सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धने या संधीचा फायदा घेतला आणि लेग साइडला चेंडू फेकला. हा चेंडू वॉर्नरच्या बॅटला स्पर्श करत सॅमसनच्या हातात गेला होता. परिणामी तो २८ धावांवर झेलबाद झाला. मैदानावरील सर्वांना वॉर्नरची विकेट गेल्याचे समजले.

मात्र आपण झेलबाद झाल्यानंतरही वॉर्नर असे वागत होता जणू चेंडू त्याच्या बॅटला लागलेलाच (David Warner Dishonesty) नाही. तो प्रसिद्धला हात दाखवून कसला तरी इशारा करताना दिसला. इकडे विकेटचा जल्लोष करत असलेल्या प्रसिद्धने वॉर्नरला तो बाद असल्याचे सांगितले. तसेच पंचांनीही त्याला बाद करार केले. त्यानंतर कुठे वॉर्नर पव्हेलियनच्या दिशेने निघाला.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान दिल्लीचे खेळाडू या सामन्यात वेगळ्याच मूडमध्ये दिसले. दिल्लीच्या डावातील शेवटच्या षटकादरम्यान पंचांनी नो बॉल न दिल्याने पंत चांगलाच संतापला. त्याने खेळपट्टीवरील त्यांच्या फलंदाजांना मैदान सोडण्याचा इशारा देखील दिला. तसेच तो बटलरवरही रागवताना दिसला. यामुळे पंतला मोठी शिक्षाही झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दिल्ली- राजस्थान सामन्यातील ‘नो बॉल’मुळे चांगलाच पेटला पंत; मॅक्सवेलने मीम शेअर करत विचारला प्रश्न

IPL 2022 | प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील का चेन्नई आणि मुंबई संघ? जाणून घ्या उभय संघांची समीकरणे

‘खूश आहे की कंपनीच्या नावात माही’, धोनीच्या खेळावर आनंद महिंद्राही फिदा


ADVERTISEMENT
Next Post
Shane-Watson

DC vs RR। वातावरण इतकं तापलं तरीही तिसऱ्या पंचांकडे का गेला नाही निर्णय? जाणून घ्या एका क्लिकवर

Shane-Watson-Delhi-Capitals

नो बॉल विवादावरून प्रशिक्षक वॉटसनचा दिल्ली संघालाच घरचा आहेर; म्हणाला, 'हे स्विकाहार्य नाही'

Mumbai-Indians

'मुंबई इंडियन्स छोट्या छोट्या गटांमध्ये विभागली जातेय', एमआयच्याच माजी खेळाडूचे मोठे भाष्य

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.